Mahavitaran Overdue Bills Collection On – थकित विजबिल भरा नाहीतर तुमची हि पण लाईट होईल गुल

महावितरण कडून सध्या अनेक ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी कामे सुरु आहेत. पण या कामाचा फटका हा वीज ग्राहकांना बसत असून कमला गती देण्याचे आव्हान महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडे आहे. आत्ताच पार पडलेल्या बैठकीत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी यासाठी अनेक सूचना महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आलाय आहेत. महावितरण कडे अनेक तक्रारी प्राप्त होत असून त्या सोडवण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले. ग्राहकांच्या असचानी समजून घेऊन यावर आवश्यक ती उपाययोजना करणे आवश्यक आहे तसेच महावितरण ने दुरुस्ती करत असताना वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करणे आवश्यक असल्याचे अध्यक्ष यांनी सांगितले.
Mahavitaran Overdue Bills
महावितरण समोर हा एक मोठा गंभीर प्रश्न असून यावर सध्या काम सुरु आहे.आता महावितरण कडून थकीत वीजबिल जमा करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरु केली आहे. यामार्फत ज्या ग्राहकांकडे वीज बिल थकले आहे त्यांच्याकडून हे विजबिल जमा करण्यात येईल. त्याचप्रमाणे विजेचा अनधिकृत वापर करणारे ग्राहक सुद्धा वाढले असून यावर देखील कारवाई करण्यात येईल.

How To Fill Mahavitaran Overdue Bill
महवितरण कडून ग्राहकांसाठी सध्या ऑफलाईन आणि ऑनलाईन अश्या दोन पद्धतीत वीजबिल भरणा केला जातो. महावितरण कार्यालयात जाऊन आपण आपले थकीत किंवा सुरळीत असलेले वीजबिल भरू शकतो. विजबिल भरणा झाल्यानंतर कार्यालयातून त्यासंदर्भातील पावती देण्यात येते जी भविष्यातील अडचणींचा कमी येते.

mahavitaran ONLINE BILLS filling
महावितरण ने घरबसल्या ग्राहकांनी आपले वीजबिल भरावे यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या प्रक्रिये मार्फत आपण कोठेही न जाता घरी बसून फोन च्या माध्यमातून आपले वीजबिल भरू शकता असे अधिकाऱ्यांनी सांगितले यासाठी ग्राहकांस
१. महावितरणच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या
२. ग्राहकांसाठी या पोर्टल वर जा आणि ऑनलाईन वीज भरणा हा पर्याय निवडा .
३. तुमचा ग्राहक क्रमांक प्रविष्ट करा आणि इतर आवश्यक माहिती भरा.
४. तुम्हा हवा असलेला भरणा पर्याय निवडा – क्रेडिट/डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI (Google Pay, PhonePe, Paytm).
५. वीज बिल भरणा करा व त्याची पावती आपल्या कडे ठेवा.
आता upi द्वारे आपणं त्याच्याच अँप द्वारे सरळ वीज बिल भरू शकतो हि सुविधा शक्यतो सर्वच upi अँप मध्ये देण्यात आला असून ग्राहकांनी भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी विल बिल भरून झाल्यानंतर त्याची पावती जवळ ठेवा.
Mahavitaran Meeting Points
महावितरण चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत काही मुद्धे स्पष्ट केले आणि अधिकाऱ्यांना हि काही सूचना दिल्या आहेत , त्या पुढीलप्रमाणे
- ग्राहकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर योग्य ती उपाययोजना करावी.
- वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचं प्रमाण अधिक , हि बाब गंभीर.
- वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ताबडतोब पर्याय करावा , ग्राहकांना त्रास देऊ नये.
- देखभाल व दुरुस्ती साठीच वीजपुरवठा कमी वेळासाठी बंद करणे.
- जास्तीत जास्त नवीन ग्राहक जोडणे.
Mahavitaran Bill
सकाळ न्यूज पेपर मध्ये असलेल्या माहिती नुसार पुणे , बारामती , कोल्हापूर या परिमंडला साठी आढावा बैठक पार पडली. या बैठकी मध्ये लोकेश चंद्र यांनी अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या सूचना केल्या. या परिमंडळात असलेल्या औद्योगिक वसाहतींना सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा. तसेच ग्राहकांच्या तक्रारी समजून घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करण्यात याव्या. या बैठकी साठी संचालक सचिन तालेवार ,कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे , धनंजय औढेंकर , पुणे प्रादेशिक संचालक सुनील काकडे , मुख्य अभियंता पेठकर आणि स्वप्नील काटकर उपस्थित होते. महावितरण मधील महसूल वाढ करण्यासाठी नवीन ग्राहकांचे स्वागत करा. महावितरण ग्राहकांच्या अडचणी समजून घेऊन आवश्यक ती मदत करा. तसेच गेल्या काही दिवसात विजखंडीत होण्याचं प्रमाण जास्त आहेत आणि हि बाब गाम्भीर असल्याचे हि चंद्र यांनी म्हटले.