Dhadak 2 Movie Review – धडक २ चित्रपटाचे परीक्षण: पुन्हा एकदा प्रेम विरुद्ध समाज?
सैराट चित्रपटाने मराठी रसिकांच्या मनावर राज्य केल्या नंतर धडक हा चित्रपट बनवण्यात आला.धडक चित्रपट हा या चित्रपटाचा हिंदी रिमेक असून तोही प्रेक्षकांना खूप आवडला. आता याच चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. धडक २ हा चित्रपट शुक्रवारी १ ऑगस्ट ला संपूर्ण भारतात प्रदर्शित करण्यात आला असून यामधून समाज व्यवस्थेला आरसा दाखवण्याचं काम करण्यात आहे. या चित्रपटाची कथा हि सामाजिक अन्याय ,जातीय भेदभाव ,आणि प्रेम यांवरधारीत आहे. धडक चित्रपटातून सामाजिक विषमेचा खरा चेहरा दाखवण्याचं काम केलं आहे.
Dhadak Movie
धडक चित्रपटात ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांची प्रमुख भूमिका पाहायला मिळाली. हा चित्रपट सैराट या मराठी चित्रपटाचा रिमेक होता.सैराट प्रमाणेच या चित्रपटात अगदी होतीय व्यवस्था आणि प्रेम यांतील भिन्नता दर्शवण्यात अली होती.धडक चित्रपटात आशुतोष राणा, अंकित बिष्ट, श्रिधर वत्सर हे अधिक प्रभावी भुकेमिक दिसले. धडक या चित्रपटाचे बजेट हे अंदाजे ४१ कोटी रुपये होते. या चित्रपटाने जागतिक स्तरावर सुमारे ११०.११ कोटी रुपयांची चांगली कमाई सुद्धा केली होती. धडक या चित्रपटासाठी मराठी संगीतकार आणि गायक अजय – अतुल यांनी गाणी गेली होती.
Dhadak 2 Movie Cast
धडक २ या चित्रपटात नवीन चेहरे दिसत असून सिद्धांत चतुर्वेदी आणि त्रिप्ती डिमरी हे मुख्य भूमिकेत आहेत. या अगोदर धडक चित्रपटात ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांची जोडी पाहायला मिळाली.धडक चित्रपटात सहाय्यक कलाकारांची अनुभवी टीम असल्याचं दिसत आहे. यामध्ये झाकीर हुसेन, सौरभ सचदेवा, दीक्षा जोशी, विपिन शर्मा असे नावाजलेले व हरहुन्नरी कलाकार या चित्रपटाची शोभा वाढवतात.
धडक 2 चित्रपटातील कलाकार
भूमिका | कलाकार |
---|---|
नीलेश (मुख्य पात्र, दलित कायद्याचा विद्यार्थी) | सिद्धांत चतुर्वेदी |
विधी (उच्चवर्णीय वर्गातील मुलगी) | त्रिप्ती डिमरी |
प्राचार्य हैदर अन्सारी | झाकीर हुसेन |
शंकर (विरोधी पात्र) | सौरभ सचदेवा |
निमिषा | दीक्षा जोशी |
नीलेशचे वडील | विपिन शर्मा |
रॉनी (विधीचा भाऊ) | साद बिलग्रामी |
अरविंद (विधीचे वडील) | हरीश खन्ना |
शेखर | प्रियांक तिवारी |
वासू | आदित्य ठाकरे |
प्रकाश (विधीचा काका) | अभय जोशी |
नीलेशची आई | अनुपा फतेहपुरा |
ऋचा | मंजिरी पुपाला |
इतर सहाय्यक कलाकार | शंतनू पांडे, बाला, अमित जात, रवि, अश्वंत लोधी, मयंक खन्ना, ऋचा |
Dhdak 2 movie Story
०१ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित झालेला धडक 2 हा चित्रपट केवळ प्रेमकथा नाही, तर सामाजिक वास्तव दाखवणारा आरसाच आहे. सिद्धांत चतुर्वेदी आणि त्रिप्ती डिमरी यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट, जातीभेद आणि सामाजिक अन्यायावर थेट भाष्य करतो.नीलेश(नायक) कायद्याचा विद्यार्थी (दलित )आणि विधी(नायिका) उच्चवर्णीय मुलगी यांचं प्रेम जातीयतेच्या भिंतींवर आदळतं. त्यांच्या नात्याला विरोध, अपमान आणि संघर्ष यांचा सामना करावा लागतो. दिग्दर्शिका शाझिया इक्बाल यांनी ही कथा अत्यंत संवेदनशीलतेने मांडली आहे.चित्रपटात फक्त प्रेम नाही, तर ओळख, आत्मसन्मान आणि सामाजिक समतेचा लढा आहे.
Dhadak 2 Movie BUdget And Collection
धडक 2 हा चित्रपट अपेक्षेने भरलेला चित्रपट आहे. हा चित्रपट १ ऑगस्ट २०२५ रोजी संपूर्ण भातात आणि जगभरात प्रदर्शित झाला. सिद्धांत चतुर्वेदी आणि त्रिप्ती डिमरी यांच्या अभिनयाने हा चित्रपट सजलेला आहे. हा चित्रपट ₹४०–₹६० कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला आहे. पहिल्या तीन दिवसांत चित्रपटाने ₹१०.३४ कोटींची चांगली कमाई केली आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया मिश्र असल्या तरी सामाजिक विषय आणि भावनिक कथा यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे.हा चित्रपट हिट होण्यासाठी ₹५० कोटींचा टप्पा पार करणे आवश्यक आहे. OTT आणि डिजिटल हक्क विक्रीमुळे या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये आर्थिक भर होण्याची शक्यता आहे.
Dhadak 2 Movie Director And Music
धडक 2 ही केवळ प्रेमकथा नाही तर ती सामाजिक वास्तवाचं प्रतिबिंब आहे. शाझिया इक्बाल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट Pariyerum Perumal या तमिळ चित्रपटाचा पुनरावृत्ती आहे. Bebaak या लघुपटासाठी ओळखल्या जाणाऱ्या शाझियानयांनी या चित्रपटात जात-पात आणि वर्गभेद यावर प्रकाश टाकला आहे. शाझिया इक्बाल यांचं दिग्दर्शन हे वास्तववादी असून भावनिक सुद्धा आहे.चित्रपटाचं संगीत विविधतेने भरलेलं आहे. पाच संगीतकार आणि अनेक गीतकार यांच्या योगदानामुळे प्रत्येक गाणं वेगळं वाटतं, पण ते कथेशी सुसंगत राहतं.
संगीतकार
रोचक कोहली, तनिष्क बागची, जावेद-मोशिन, श्रेयस पुराणिक, हेशम अब्दुल वहाब
गीतकार
रश्मी विराग, सिद्धार्थ–गरिमा, गुरप्रीत सैनी, ओझिल दलाल
गायक
श्रेयाघोषाल, जुबिन नौटियाल, अरिजीत सिंग, दर्शन रावल, जोनिता गांधी, विशाल मिश्रा
प्रमुख गाणी
बस एक धडक – श्रेया आणि जुबिन यांचं भावस्पर्शी युगलगीत
प्रीत रे – दर्शन आणि जोनिता यांचं प्रेमगीत
दुनिया अलग – अरिजीतचा आवाज सामाजिक वेदना व्यक्त करतो
तू मेरी धडक है – विशाल मिश्राचं एकाकी प्रेम
बावरिया – लोकसंगीत आणि आधुनिक बीट्सचं मिश्रण
या गाण्यांमुळे या चित्रपटाच्या भावना अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात.