Fish Venkat Dies at 53-तेलगू चित्रपटातील मुख्य खलनायकाचे निधन

Fish Venkat Dies at 53-तेलगू चित्रपटातील मुख्य खलनायकाचे निधन

fish venkat death

Fish Venkatesh As A Mangalampalli Venkatesh

मंगलमपल्ली वेंकटेश म्हणजेच फिश वेंकटेश यांचा जन्म ३ ऑगस्ट १९७१ मध्ये माचीलापटणम येथे झाला आणि त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात २००० साली केली . त्यांच्या जाण्याने तेलगू चित्रपट इंडस्ट्रीला शुक्रवारी मोठा धक्का बसला . फिश वेंकटेश यांचे हैद्राबाद येथे दुःखद निधन झाले .त्याच्या निधनाने तेलगू चित्रपट इंडस्ट्री मध्ये दुःखाचे सावट पसरले . आपल्या अभिनयाने तेलगू चित्रपट इंडस्ट्री मध्ये त्यांनी एक चांगले स्थान मिळवले होते . फिश वेंकट यांनी अनेक चित्रपटामध्ये खलनायक म्हणून आपली भूमिका साकारली होती आणि ती प्रेक्षकांना हि खूप आवडली होती .त्यांच्या अचानक जाण्याने प्रेक्षकांमध्ये दुःखाचे सावट आले आहे.

अवघ्या त्रेपन्नव्या वर्षी निधन -Fish Venkat Death


फिश वेंकट यांचं अवघ्या त्रेपन्नव्या वर्षी निधन झाले . फिश वेंकट यांची किडनी व लिव्हर निकामी झाल्यामुळे त्यांना हैद्राबाद येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते . मात्र त्यांची प्रकृती स्थिर नसल्याने व अधिक खालावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. फिश वेंकट यांच्या निधनाने अनेक कलाकार व चाहत्यांनी शोक व्यक्त केला . फिश वेंकट यांच्या किडनी प्रत्यारोपणासाठी आर्थिक मदतीची गरज होती यासाठी त्यांनी आर्थिक मदतीची मागणी सुद्धा केली होती . फिश वेंकट यांची कन्या श्रावंती हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक मदतीचे आवाहन केले होतेआणि किडनी ट्रान्सप्लांट साठी सुमारे ५० लक्ष रुपयांची गरज आहे. यासाठी काही अभिनेते आणि चाहत्यांनी मदत केली पण यासाठी लागणार निधी उभा करण्यात अपयश आले. फिश वेंकट यांच्या किडनी ट्रान्सप्लांट साठी अभिनेता विश्वक सेन यांनी दोन लाखांची मदत केली होती .


पत्नी सुवर्णा आणि मुलगी श्रावंती असा छोटासा परिवार-Fish Venkat Family


फिश वेंकट यांच्या पश्चात त्यांची पत्नी सुवर्णा आणि मुलगी श्रावंती असा छोटासा परिवार आहे . त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने त्यांच्या परिवारावर आणि तेलगू चित्रपटसुष्ट्रीत शोककळा पसरली आहे . फिश वेंकट यांनी साम्माक्का सराक्का (२०००) या चित्रपटातून तेलगू चित्रपट इंडस्ट्री मध्ये पहिले पाऊल ठेवले त्यानंतर त्यांनी २०२५ पर्यंत सुमारे ९२ चित्रपटात काम केले त्यापैक्की बन्नी , डीजे टिल्लू , खुशी ,दिल ,भगीरथा, दुबई सिनु ,योगी ,कृष्णा ,स्लम डॉग हसबंड अशा चित्रपटातील भूमिका चाहत्यांसाठी वेगळी पर्वणी ठरली.तसेच त्यांच्या खलनायकाची भूमिका रसिक मनावर कायम राज्य करत राहील.

1 thought on “Fish Venkat Dies at 53-तेलगू चित्रपटातील मुख्य खलनायकाचे निधन”

Leave a Comment