Friendship Day – मैत्रीचे रंग: आठवणींच्या गंधात न्हालेलं नातं

Friendship Goals Activated – आज मैत्रीचा दिवस

मैत्री… एक असं नातं जे रक्ताचं नसतं, पण मनाच्या गाभ्यात खोलवर रुजलेलं असतं. जन्माला येताना आपण नात्यांची ओळख घेऊन येतो, पण मैत्री ही अशी भेट आहे जी आयुष्याच्या प्रवासात आपल्याला मिळते अनपेक्षितपणे, पण कायमची.आज फ्रेंडशिप डे! हा दिवस फक्त एक तारीख नाही, तर आपल्या आयुष्यातल्या त्या खास व्यक्तींना आठवण्याचा आणि त्यांचं आपल्यासाठी असलेलं स्थान मनापासून स्वीकारण्याचा दिवस आहे

WHATS IS THE MEANING OF FRIENDSHIP

मैत्री म्हणजे गप्पांचा पाऊस आणि समजूतदार पानाचे ऊन.
मैत्री म्हणजे न बोलता समजणं आणि न मागता साथ देणं.
मैत्री म्हणजे एकमेकांच्या यशात आनंद आणि अपयशात आधार.
मैत्री म्हणजे “काही नाही झालं” म्हणत खांद्यावर हात ठेवणं.

friendship day quotes

Friendship Day Wishes In English

1.Happy Friendship Day! You bring sunshine into my life and laughter into my days.”

2. “You’re not just my friend—you’re family I chose. Thank you for being you.”

3. “Through thick and thin, you’ve been my constant. I’m forever grateful.”

4. “Your friendship feels like home—steady, comforting, and full of love.”

5. “Friends like you make life’s toughest moments survivable and its best moments unforgettable.”

6. “You’re the peanut butter to my jelly and the chaos to my calm. Happy Friendship Day!”

7. “We’ll be friends until we’re old and senile. Then we’ll be new friends again!”

8. “You’re my emergency contact for drama, gossip, and food cravings.”

9. “Our friendship is like WiFi—strong, invisible, and everywhere I go!”

10. “If I had a rupee for every weird inside joke we’ve made, I could retire by now.

11. “Distance means nothing when someone means everything. Happy Friendship Day!”

12. “Even though miles keep us apart, our friendship stays strong in my heart.”

13. “True friendship doesn’t fade with distance. I feel your support every day.”

14. “Here’s to the friend who’s always a text away, no matter the time zone.

15. “A friend is someone who knows all about you and still loves you.” – Elbert Hubbard

16. “Walking with a friend in the dark is better than walking alone in the light.” – Helen Keller

17. “Friends are the family we choose for ourselves.”

18. “A true friend is one soul in two bodies.” – Aristotle

Friendship Day Marathi Quotes

1.”खरे मित्र कधीच दूर जात नाहीत, जरी ते रोज बोलत नसले तरी… मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

2. “मैत्री आपली मनात जपली… कधी सावलित विसावली, कधी उन्हात तापली… मैत्री दिनाच्या शुभेच्छा!”

3. “हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा, जो हजार जण तुमच्या विरुद्ध असताना तुमच्या सोबत असेल.”

4. “जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, तिथे मैत्री असते… मैत्री दिनाच्या शुभेच्छा!”

5. “मैत्री हे जगातील एकमेव नातं आहे… जे रक्ताचं नसलं तरी खात्रीचं असतं.”

6. “तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात… आणि तुला याची खात्री असणे यालाच मैत्री म्हणतात.”

7. “जीवनात अनेक मैत्रिणी येतात जातात… पण जी हृदयात घर करून राहते, ती मैत्रीण माझ्यासाठी तूच आहेस!”

8. “मैत्री हसवणारी असावी, चिडवणारी असावी… पण कधीच बदलणारी नसावी!”

9. “आज काल जळणारे भरपूर झालेत… त्यांना जळू द्या, आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत हे त्यांना कळू द्या!”

10. “मैत्री म्हणजे एकदम झकास गोष्ट… जी हसवते, रडवते आणि कायम सोबत राहते!”

friendship day massage
Friendship Day Message

मैत्री हे नातं शब्दांपेक्षा भावनांनी बांधलेलं असतं. ती हसवते, रडवते, समजून घेते आणि कधीच साथ सोडत नाही. आयुष्यात अनेक नाती येतात आणि जातात, पण खरी मैत्री मनात घर करून राहते.आज फ्रेंडशिप डे! हा दिवस आपल्या जिवलग मित्रांना आठवण्याचा, त्यांचं आपल्या आयुष्यातील स्थान मनापासून स्वीकारण्याचा. एक छोटा मेसेज, एक फोन कॉल, किंवा एक गप्पांची भेट — एवढंच पुरेसं असतं मैत्री जपण्यासाठी.

Today Friendship Day

आज फ्रेंडशिप डे — मैत्रीचा साजरा करण्याचा खास दिवस! मैत्री म्हणजे नात्यांची गोडी, विश्वासाचा धागा आणि आठवणींचा खजिना. आयुष्यात अनेक नाती येतात आणि जातात, पण खरी मैत्री मनात खोलवर रुजते आणि आयुष्यभर साथ देते.

शाळेतील गप्पा, कॉलेजचे कट्टे, आणि आयुष्याच्या वळणांवर मिळालेली साथ — हीच मैत्रीची खरी ओळख. आजच्या दिवशी एक छोटा मेसेज, एक फोन कॉल, किंवा एक गप्पांची भेट हेच मैत्री जपण्याचे खरे मार्ग आहेत.

“मैत्री म्हणजे न बोलता समजणं, न मागता साथ देणं, आणि न विसरता कायम सोबत राहणं.”

National Friendship Day 2025

प्रत्येक ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी सर्वत्र फ्रेंडशिप दिन साजरा करण्यात येतो.यावर्षी आज म्हणजेच दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ ला हा दिवस आपण साजरा करूयात. हा एक असा दिवस आहे जो मैत्रीच्या नात्याला घट्ट करतो तरं आपल्या आयुष्यातील खास व्यक्तींना मित्र प्रेम समर्पित करण्याचा हा दिवस आहे. मैत्री दिन साजरा करत असताना अफ्रेन्डशिप बँड ,छोटेशे गिफ्ट्स देऊन हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी मैत्री च्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मित्रांना भेटणे ,जुने फोटो पाहणे ,जुन्या आठवणी जाग्या करणे हा उद्देश असतो. मैत्री दिन हा केवळ एक दिवस नसतो, ती एक आठवण असते की आपल्याला आयुष्यात काही असे लोक आहेत जे आपल्याला समजतात, स्वीकारतात आणि आपल्यासाठी नेहमी असतात.

Leave a Comment