India vs England 4th Test Series Live Updates – भारतीय संघाने पहिल्याच षटकात गमावले २ बळी
भारत आणि इंग्लंड या दोन संघात सध्या चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे सुरु आहे. सध्या इंग्लंड चा संघ हा २-१ ने आघाडीवर असून त्यांच्या बरोबरी साठी भारतीय संघाला चौथा सामना जिंकणे महत्वाचे आहे .चौथ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी भारतीय संघ पुनरागणासाठी प्रयत्न कारणार आहे. भारतीय संघ २-१ ने मागे असून या कसोटी मध्ये सुद्धा मागे असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये इंग्लंड च्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलेच धारेवर धरले असल्याचं दिसून आलं.

India Vs England – India 1st innings
भारताच्या पहिल्या इंनिंग मध्ये भारताने ३५८ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये यशस्वी जैस्वाल ने चांगली फलंदाजी करत ५८ धाव केल्या. याच सोबत के एल राहुल ने ४६ ,साई सुदर्शन ६१ , शुभमन गिल १२ ,पंत ५४ ,रवींद्र जडेजा २० ,वॉशिंग्टन सुंदर २७ ,अंशुल कंबोज ० ,बुमराह ४ ,तर सिराज ने ५ अश्या प्रत्येकी धाव केल्या. याचसोबत भारतीय संघाला अधिकच्या ३० धावा मिळाल्या. इंग्लंड संघाच्या गोलंदाजीन भारतीय संघाला चांगलाच घाम फुटला. ख्रिस ओएक्स ने भारताचा १ गाडी बाद केले तर जाफ्रा आर्चर ने ३ ,ब्रायडन कार्स ०, बेन स्टोक्स ५ , लिअम डॉसन १ ,असे बळी घेत भारताचा संपूर्ण संघ मैदान बाहेर पाठवला.
India Vs England – England 1st Innings
इंग्लंड च्या पहिल्या इंनिंग ची सुरुवात चांगली धमाकेदार झाली. या इंनिंग अखेर इंग्लंड ने ६६९ धावांचा मोठा डोंगर उभा केला आणि भारताच्या अडचणीत वाढ केली. यामध्ये इंग्लंड संघ कडून फलंदाजी करताना झॅक क्रावली ८४ ,डुकेत ९४ ,ओलि पॉप ७१ , रूट १५० , हॅरी ब्रूक ३ , संघाचा कर्णधार स्टोक्स १४१ , जामी स्मिथ ९ ,लिअम डॉसोन २६ , ख्रिस वोक्स ४ ,ब्रायडॉन कार्स ४७ जाफ्रा २ अश्या प्रत्येकी धावसंख्या उभारली. यामध्ये भारताकडून ३८ अधिकच्या धाव सुद्धा मिळवल्या. तसेच भारतीय गोलंदाजांनी संपूर्ण संघाला आऊट केले .यामध्ये बुमराह २ ,अंशुल कंभोज १ ,सिराज १ , ठाकूर ० ,रवींद्र जडेजा ४ ,वॉशिंग्टन सुंदर २ असे गडी बाद केले.

india loose two wicket in one over
भारत आणि इंग्लंड यांचा तीन दिवसात पहिला सेशन पूर्ण झाले आणि चौथ्या दिवशी दुसऱ्या सेशन ला सुरुवात झाली . चौथ्या दिवसाच्या पहिल्या इंनिंग मध्ये भारताला मोठा धक्का सोसावा लागला. भारताचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल ला आपले खाते खोलता नाही आले व तो शून्यावर मैदान बाहेर आला. राहुल हा मैदानात पोहोचताच भारताला आणखी दुसरा धक्का साई सुदर्शन च्या रूपानं बसला तो देखील जैस्वाल च्या नंतर शून्यावर आऊट झाला. ख्रिस वोक्स च्या गोलंदाजीवर या दोंघांना आपली विकेट गमवावी लागली.भारतीय फलंदाजांना इंग्लंड ला हरवण्यासाठी मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे पण या दोन विकेट मुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसत आहे.
India vs England – Ben Stokes Century
इंग्लंड संघाचा कर्णधार आणि यशस्वी गोलंदाज बेन स्टोक्स ने चांगली फलंदाजी करत आपले शतक पूर्ण केले. यासाठी त्याने १६४ चेंडूचा सामना केला व शतक पूर्ण केलं. बेन स्टोक्स येवड्यावरकच थांबा नसून त्याने संघासाठी १९८ चेंडूचा सामना करत १४१ धाव बनवल्या.बेन स्टोक्स च्या या खेळीं धावसंख्ये मध्ये चांगलीच वाढ झाली. बेन स्टोक्स हा फक्त फलंदाजीत नव्हे तर गोलंदाजीतही चमकला आणि त्यानं भारताचे पाच गडी तंबूत पाठवले.

India Vs England – Shubhaman Gill Failed as Captain
शुभमं गिल हा कसोटी मालिकेचा पहिल्यांदाच कर्णधार झाला असून त्याच्या निर्णयांवर शंका उपस्थित केली जात आहे. गिल हा चांगल्या फॉर्म मध्ये असल्याच दिसून येत आहे त्याने दोन शतक तर एक द्विशतक झळकावले. पण त्याच्या निर्णय क्षमतेवर अनेक क्रिकेटपटूंनी टीका केली होती.जेव्हा गिल ने २६० धाव करण्यात यश मिळवले तेव्हा त्याला पाहता चांगले खेळाडू त्यापुढे फिके पडतील असाही काही क्रिकेट पटूनच मत होत.
Dhruv Jurel Replancing Rishbh Pant
ऋषभ पंत हा पायाच्या दुखापतीमुळे मैदान बाहेर आहे. संघामध्ये सध्या के एल राहुल हा यष्टीरक्षक असताना देखील पंत च्या जागी ध्रुव जुरेल ला संधी देण्यात अली आहे. ऋषभ पंत च्या उजव्या पायाला दुखापत झाली असून डॉक्टरांनी त्याला सहा आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. ध्रुव जुरेल हा जागतिक क्रिकेट मध्ये २०२४ ला पहिला सामना खेळाला होता.