Pixel 9 vs Pixel 10 : Google चा स्मार्टफोन गेम ‘स्मार्ट’ आहे की ‘स्ट्रॅटेजिक’?
Google ने Pixel 10 हा फोन सादर करताना एक गोष्ट स्पष्ट केली आहे. गुगल आता हार्डवेअरपेक्षा सॉफ्टवेअर आणि AI वर जास्त भर देत आहेत. पण Pixel 9 वापरणाऱ्यांसाठी प्रश्न असा आहे कि “खरंच अपग्रेड करावं का, की Google ने आपल्याला फक्त ‘नवीन’ वाटावं म्हणून काही बदल केले?” या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की Pixel 10 मध्ये काय बदलले, काय गमावले, आणि कोणता फोन तुमच्यासाठी ‘खरंच’ स्मार्ट आहे.
हार्डवेअर: अपग्रेड की कटबॅक?
हार्डवेअरच्या बाबतीत Pixel 10 हा स्मार्टफोन एक विचित्र मिश्रण आहे. जिथे काही गोष्टी सुधारल्या आहेत, तर काही ठळक घटक कमी करण्यात आल्या आहेत. Pixel 9 मध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 48MP ultra-wide सेन्सर होता, जे Google च्या computational photography साठी आदर्श मानले जात होते. Pixel 10 मध्ये मुख्य कॅमेरा 48MP झाला आणि ultra-wide फक्त 13MP म्हणजे clarity आणि depth कमी झाली.
याउलट, Pixel 10 मध्ये 10.8MP telephoto lens मिळतो, जो 5x optical zoom आणि 100x Super Res Zoom देतो. zoom वाढवून wide shots कमी केले गेले आहे. याशिवाय, Tensor G5 चिप TSMC च्या 3nm प्रोसेसवर आधारित असून ती Pixel 9 च्या G4 पेक्षा वेगवान आणि efficient आहे. पण wired charging अजूनही 30W वरच आहे म्हणजे battery upgrade असूनही charging speedमध्ये फारसा फरक नाही. एकंदरीत, Pixel 10 चा हार्डवेअर अपग्रेड ‘स्मार्ट’ वाटतो, पण काही बाबतीत तो ‘स्ट्रॅटेजिक कटबॅक’सुद्धा आहे.
प्रोसेसर आणि परफॉर्मन्स: TSMC चा गेमचेंज?
Pixel 10 मध्ये वापरण्यात आलेली Tensor G5 चिप ही TSMC च्या अत्याधुनिक 3nm प्रोसेसवर आधारित आहे, जी Pixel 9 मधील Tensor G4 चिपपेक्षा अधिक वेगवान, ऊर्जा-कार्यक्षम आणि थंड राहणारी आहे. या नव्या प्रोसेसरमुळे AI फीचर्स जसे की Magic Editor, Call Assist, आणि Live Translation—अधिक वेगाने आणि अचूकपणे काम करतात. Pixel 9 मध्ये काही वापरकर्त्यांनी heating issues आणि lagging अनुभवले होते, जे Pixel 10 मध्ये कमी होण्याची शक्यता आहे. पण हा गेमचेंज खरंच वापरकर्त्यांच्या रोजच्या अनुभवात जाणवतो का, की तो फक्त launch event मधील आकड्यांपुरता मर्यादित आहे?
Google चा फोकस आता raw power पेक्षा smart performance वर आहे म्हणजे फोन वेगवान वाटावा यासाठी specs नाही, तर software intelligence वापरली जाते. Pixel 10 चा प्रोसेसर हा एक तांत्रिक उडी आहे, पण वापरकर्त्यांसाठी तो अनुभवात किती बदल घडवतो, हीच खरी कसोटी ठरेल.
बॅटरी आणि चार्जिंग: Qi2 म्हणजे काय?
Pixel 10 फोन मध्ये Qi2 वायरलेस चार्जिंगचा समावेश म्हणजे Google ने एक नवा स्टँडर्ड स्वीकारला आहे जो अधिक वेगवान, सुरक्षित आणि efficient चार्जिंग अनुभव देतो. Qi2 ही Magnetic Power Profile वापरते, ज्यामुळे चार्जिंग पॅडवर फोन अचूकपणे बसतो आणि ऊर्जा वाया जाण्याची शक्यता कमी होते. Pixel 9 मध्ये Qi सपोर्ट होता, पण तो Qi2 इतका optimized नव्हता. याशिवाय Pixel 10 मध्ये 4970mAh बॅटरी आहे, जी Pixel 9 च्या तुलनेत थोडी मोठी असून अधिक runtime देते. मात्र wired charging अजूनही 30W वरच आहे.
तांत्रिक तुलना: Pixel 9 vs Pixel 10
वैशिष्ट्य | Pixel 9 | Pixel 10 |
---|---|---|
डिस्प्ले | 6.3″ OLED, 2700 nits | 6.3″ OLED Actua, 3000 nits |
प्रोसेसर | Tensor G4 (4nm) | Tensor G5 (3nm, TSMC) |
RAM/Storage | 12GB / 256GB | 12GB / 256GB |
बॅटरी | 4700mAh, 27W | 4970mAh, 30W, Qi2 wireless |
कॅमेरा | 50MP + 48MP (Ultra-wide) | 48MP + 13MP (Ultra-wide) + 10.8MP (Telephoto) |
फ्रंट कॅमेरा | 10.5MP | 10.5MP |
OS | Android 15 | Android 16 |
Zoom | 30x Super Res | 100x Super Res |
किंमत (भारत) | ₹74,999 | ₹79,999 |
Pixel 9 vs Pixel 10: किंमत तुलना (भारत)
मॉडेल | Pixel 9 किंमत | Pixel 10 किंमत | किंमतीत फरक |
---|---|---|---|
Pixel 9 (256GB) | ₹74,999 | ₹79,999 | ₹5,000 ↑ |
Pixel 9 Pro (256GB) | ₹94,999 | ₹99,999 | ₹5,000 ↑ |
Pixel 9 Pro XL (512GB) | ₹1,09,999 | ₹1,14,999 | ₹5,000 ↑ |
Pixel 9a (128GB) | ₹39,999 | उपलब्ध नाही | — |
GOOGLE कडून स्मार्ट स्ट्रॅटेजि चा वापर
Google चा Pixel 10 सिरीजमधील ‘स्मार्ट’ स्ट्रॅटेजी ही पारंपरिक हार्डवेअर अपग्रेडपेक्षा वेगळी आहे. या फोन मध्ये ती एक सॉफ्टवेअर-केंद्रित, AI-ड्रिव्हन दिशा दर्शवते. त्यांनी ultra-wide कॅमेरा कमी करून telephoto zoom वाढवला, आणि Tensor G5 चिपसह AI फीचर्स अधिक प्रगत केले. Google ला हे ठाऊक आहे की वापरकर्ते आता फक्त मेगापिक्सेलवर नाही, तर स्मार्ट अनुभवावर भर देतात. Pixel 10 हा फोन नाही, तर एक Google ecosystem device आहे. जिथे फोटो एडिटिंग, कॉल सहाय्य, आणि real-time translation हे सगळं फोनच्या कॅपेबिलिटीपेक्षा Google च्या क्लाउड आणि AI वर अवलंबून आहे. ही स्ट्रॅटेजी वापरकर्त्यांना ‘नवीन’ वाटावी म्हणून नाही, तर त्यांना Google च्या सेवांमध्ये अधिक खोलवर गुंतवण्यासाठी आहे.