Realme P4 Pro 5G भारतात लाँच! – ₹२५ हजारात फ्लॅगशिप फिचर्स?
Realme ने आपला नवीन स्मार्टफोन P4 Pro 5G भारतात लाँच करताच मिड-रेंज स्मार्टफोन मार्केटमध्ये खळबळ उडवली आहे. या फोनची किंमत केवळ ₹२४,९९९ पासून सुरू होत असून या फोनमध्ये फ्लॅगशिपला टक्कर देणारे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. रिअलमी च्या या फोन मध्ये 144Hz AMOLED डिस्प्ले, 7,000mAh बॅटरी, आणि Sony IMX896 कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. Realme चा हा प्रयत्न केवळ बजेट-फ्रेंडली नाही, तर परफॉर्मन्स, डिझाइन आणि टिकाऊपणाच्या बाबतीतही तो premium अनुभव देण्याचा दावा करतो. भारतीय ग्राहकांसाठी हे एक आकर्षक पॅकेज ठरू शकते, विशेषतः जे लोक उच्च दर्जाचे फिचर्स कमी किंमतीत शोधत आहेत.
Realme P4 Pro 5G – PERFORMANCE
Realme P4 Pro 5G चा परफॉर्मन्स विभाग गेमिंगप्रेमी आणि मल्टीटास्किंग करणाऱ्या युजर्ससाठी खास तयार करण्यात आला आहे. यामध्ये दिलेला Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर आणि HyperVision AI चिप एकत्रितपणे ग्राफिक्स अधिक स्पष्ट करतात, फ्रेम रेट स्मार्टपणे अपस्केल करतात आणि अॅप्स दरम्यान स्विच करताना कोणतीही अडचण येऊ देत नाही. Android 15 वर चालणारा Realme UI 6.0 इंटरफेस वेगवान आणि सुलभ आहे, तर 12 GB पर्यंत RAM आणि 256 GB स्टोरेज यामुळे मोठ्या गेम्स, व्हिडिओ एडिटिंग किंवा एकाच वेळी अनेक अॅप्स वापरणं सहज शक्य होतं. हे फिचर्स पाहता, P4 Pro 5G हा केवळ बजेट फोन नाही, तर एक परफॉर्मन्स बीस्ट म्हणता येईल.
Realme P4 Pro 5G – CAMERA
Realme P4 Pro 5G चा कॅमेरा म्हणजे एकदम धमाका! यामध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असून, 50 MP Sony IMX896 मुख्य सेन्सर आहे. जो OIS (Optical Image Stabilization) सह येतो. यामुळे फोटो आणि व्हिडिओ दोन्ही अधिक स्थिर आणि स्पष्ट मिळतात. त्यासोबत 8 MP अल्ट्रावाइड लेन्स दिली आहे, जी ग्रुप फोटो किंवा निसर्गदृश्य टिपण्यासाठी उपयुक्त ठरते. पुढच्या बाजूला देखील Realme ने सरप्राइज दिलं आहे. सेल्फी साठी ड्युअल फ्रंट कॅमेरा सेटअप, ज्यामध्ये 50 MP OV50D सेन्सर आहे. हे कॅमेरे 4K @ 60fps व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात, त्यामुळे व्लॉगिंग, Instagram रील्स किंवा YouTube शॉर्ट्ससाठी हा फोन एकदम परफेक्ट आहे. सेल्फी प्रेमींना तर याचा फ्रंट कॅमेरा खास आवडणार हर नक्की आहे.
Realme P4 Pro 5G – डिस्प्ले आणि डिझाइन
Realme P4 Pro 5G चा डिस्प्ले आणि डिझाइन हा एकदम premium फील देणारा आहे. यामध्ये 6.8-इंचाचा कर्व्हड AMOLED डिस्प्ले दिला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेट आणि 6,500 निट्स ब्राइटनेस सह येतो म्हणजेच सूर्यप्रकाशातही स्क्रीन स्पष्ट दिसते आणि गेमिंग किंवा स्क्रोलिंगचा अनुभव buttery smooth वाटतो. डिव्हाइसला Gorilla Glass 7i चं संरक्षण आहे, जे स्क्रॅच आणि accidental drops पासून बचाव करतं. याशिवाय, IP68/IP69 रेटिंगमुळे हा फोन पाण्यात आणि धुळीतही सुरक्षित राहतो जे या किंमतीत फारच दुर्मिळ आहे. डिझाइनबाबत बोलायचं झालं, तर हा फोन 7.68mm thickness आणि 189g वजन यामुळे तो हातात धरायला हलका आणि स्टायलिश वाटतो. curved edges आणि premium finish यामुळे तो केवळ टेक्निकल नव्हे, तर visual appeal मध्येही बाजी मारतो.
Realme P4 Pro 5G – बॅटरी आणि एक्स्ट्रा फिचर्स
Realme P4 Pro 5G मध्ये मिळणारी 7,000mAh बॅटरी ही या फोनची खरी ताकद आहे. इतकी मोठी बॅटरी एकदा चार्ज केल्यावर सहज दोन दिवस टिकू शकते, विशेषतः जर तुम्ही गेमिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग किंवा सोशल मीडिया वापर करत असाल. यासोबत 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो, ज्यामुळे काही मिनिटांतच फोन पुन्हा वापरण्यास तयार होतो.
यामध्ये 10W रिव्हर्स चार्जिंग फिचरही असून तुम्ही इतर डिव्हाइसेसना या फोनद्वारे चार्ज करू शकता, जे ट्रॅव्हल किंवा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये खूप उपयोगी ठरतं. तांत्रिक बाबतीत, Realme ने AirFlow VC कूलिंग सिस्टम दिली आहे, जी 7,000 sq mm क्षेत्रफळ व्यापते यामुळे गेमिंग किंवा व्हिडिओ एडिटिंग करताना फोन गरम होण्याची शक्यता कमी होते.
इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, आणि फुल 5G सपोर्ट यामुळे हा फोन फ्युचर-रेडी आहे.
Realme P4 Pro 5G – किंमत आणि उपलब्धता
Realme P4 Pro 5G भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे, आणि त्याची किंमत मिड-रेंज सेगमेंटमध्ये खूपच आक्रमक ठेवण्यात आली आहे.
व्हेरिएंट | किंमत (₹) |
---|---|
8 GB + 128 GB | ₹24,999 |
8 GB + 256 GB | ₹26,999 |
12 GB + 256 GB | ₹28,999 |
या फोनची विक्री २७ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार आहे. तुम्ही तो Flipkart, Realme India वेबसाइट, आणि देशभरातील ऑफलाइन स्टोअर्समध्ये खरेदी करू शकता. लाँच ऑफर्स अंतर्गत बँक डिस्काउंट्स, एक्सचेंज बोनस आणि EMI पर्यायही उपलब्ध असतील, त्यामुळे योग्य डील मिळवण्यासाठी सुरुवातीचे काही दिवस महत्त्वाचे ठरू शकतात.
फ्लॅगशिपचा अनुभव की फक्त मार्केटिंग?
Realme P4 Pro 5G च्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत पाहता, हा फोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये एक “फ्लॅगशिप किलर” ठरण्याची पूर्ण शक्यता आहे. 144Hz AMOLED डिस्प्ले, 7,000mAh बॅटरी, आणि IP69 रेटिंग ही फिचर्स या किंमतीत मिळणं दुर्मिळ आहे. यामुळे Realme ने केवळ स्पेसिफिकेशनशी खेळ न करता, वापरकर्त्याच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन आणि टिकाऊपणावरही भर दिला आहे.
पण दुसरीकडे, Snapdragon 7 Gen 4 आणि HyperVision AI चिप हे नावीन्यपूर्ण असले तरी त्यांचा प्रत्यक्ष परफॉर्मन्स फ्लॅगशिप लेव्हलचा असेल का, हा प्रश्न उरतो. कॅमेरा सेटअपमध्ये ट्रेंडी triple किंवा quad lens ऐवजी dual configuration वापरणं काही युजर्सना मर्यादित वाटू शकतं.
थोडक्यात, Realme P4 Pro 5G हा फोन “फ्लॅगशिपचा अनुभव” देण्याचा प्रयत्न नक्कीच करतो, पण त्याचा खरा कस वास्तविक वापर, सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशन, आणि लाँग टर्म परफॉर्मन्स यावर अवलंबून असेल. मार्केटिंगचा गाजावाजा बाजूला ठेवला, तर हा फोन अनेक बाबतीत आश्वासक वाटतो पण अंतिम निर्णय वापरकर्त्याच्या अनुभवावरच आधारित असेल.