Site icon AplaNewsKatta

Saiyaara Movie budget- चित्रपट अधिक रोमांचांनी भरलेला

saiyaara movie

Saiyaara Movie budget- चित्रपट अधिक रोमांचांनी भरलेला

Saiyaara चित्रपट जुलै महिन्यात होणार प्रदर्शित

Saiyara हा चित्रपट जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या चित्रपटाने भारतीय प्रेक्षकांचे मनोरंजन अधिक होईल . या चित्रपटात नवीन कलाकारांचा समावेश करण्यात आला आहे .अहाण पांडे आणि अनित पड्डा यांचा प्रथमच चित्रपट आहे . यामधून दोघेही बॉलीवूड मध्ये जोरदार एन्ट्री करत आहेत.

Saiyaara Movie – प्रदर्शन तारीख आणि बजेट

Saiyaara चित्रपट हा शुक्रवार दिनांक १८ जुलै २०२५ रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित करण्यात येणार आहे . प्रदर्शना पूर्वीच या चित्रपटाने लोकप्रियता प्राप्त केली आहे . संपूर्ण भारत मध्ये या मधील नवीन जोडीने आणि यांमधील गीतांनी सर्वांचे लक्ष चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे लावले आहे . या चित्रपटाची अधिकृत तारीख जुलै मध्ये असलीतरी या चित्रपटाचं बुकिंग अगोदरच सुरु झाले आहे .मुख्य भूमिकेत असणाऱ्या Ahaan panday याचा जन्म मुंबई मध्ये झाला आहे तर Aneet Padda हीचा जन्म अमृतसर पंजाब येथे झाला आहे . सैयारा चित्रपट हा ४५ कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आला आहे . मोहित सूरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून पहिल्याच दिवशी चांगल्या प्रकारची कमाई केली आहे . या चित्रपटाने प्रदर्शन पूर्वीच सुमारे ९. ३९ कोटी रुपये ऍडव्हान्स बुकिंग च्या माध्यमातून कमवले आहेत . आश्चर्यकारक म्हणजे २०२५ मध्ये विकी कौशल चा ‘छावा’ आणि सलमान खान ‘सिकंदर’ च्या नंतर कमाई मध्ये तिसरे स्थान कायम ठेवले आहे.

Saiyaara Movie Cast -नवीन चेहरे आणि मोहित सूरी

मोहित सूरी यांनी आपल्याला ‘आशिकी २’ आणि ‘एक व्हिलन’ सारखे प्रेमाचे संकेत देणारे चित्रपट याअगोदर बनवले आहेत . ह्या चित्रपटांनी भारतीय प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता मोहित सूरी यांचा ‘सैयारा’ हा चित्रपट सुद्धा प्रेक्षकांच्या मनावर राज्य खरें असा विश्वास मोहित सूरी यांनी व्यक्त केला आहे . अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या अभिनय चित्रपट रसिकांना कशी भुरळ घालणार आहे हे पाहावे लागेल. यया नवीन कलाकारांचं पदार्पण मोठ्या यशाने होणार आहे हे आता निश्चित झाले आहे . या चित्रपटाचे संगीत आणि या नवीन कलाकारांची केमिस्ट्री यामुळे या चित्रपटाच्या कथेशी एक चांगली उंची प्राप्त झाली आहे . हा चित्रपट केवळ प्रेम कथा नसून याध्ये वेदना ,भावना ,आणि नात्यांमधील गोडवा आहे . मोहित सूरी यांनी या चित्रपटा मधुनप्रेमाचे अनेक रंग पडद्यावर आणले आहेत. या चित्रपटातील गाणी आणि भावनिक अभिनय यांमुळे हा चित्रपट सर्वांच्या लक्षात राहील.

 

 

 

 

Exit mobile version