SBI PO Prelims 2025 Admit Cards Out – भारतीय स्टेट बँके प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठीच प्रेलियम्स प्रवेशपत्र मिळण्यास सुरुवात
भारतीय स्टेट बँक कडून प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठीच प्रवेश पत्र काल दिनांक २५ जुलै २०२५ पासून मिळण्यास सुरुवात झाली. ज्या उमेदवारांनी या पदाच्या परीक्षेसाठी अर्ज केला असेल त्यांनी एसबीआई च्या अधिकृत वेबसाईट ला जाऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकणार आहेत.
How to Downlod Sbi PO Admit Card
प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना एसबीआई च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल. याच वेबसाईट वरून आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकाल. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी पुढील गोष्टी करा ..
१. आपले प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी एसबीआई च्या अधिकृत sbi.co.in वेबसाईट ला भेट द्या.
२. या वेबसाईट च्या मुख्य पृष्ठ वरील carries या पृष्ठा वर क्लिक करा.
३. आता प्रोबेशनरी ऑफिसर (po ) प्रारंभिक प्रवेशपत्र यावर क्लिक करणे.
४. आता तुमाच्या कडे असलेल्या फॉर्म वरील नंबर आणि निर्धारित माहिती भरा .
५ . आता हे प्रवेशपत्र डाउनलोड करा व त्याची एक प्रिंट घ्या.
Sbi po Admit card and exam
एसबीआई कडून अधिकृत रित्या ५४१ प्रोबेशनरी ऑफिसर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली. त्यानंतर यासाठीचे ऑनलाईन अर्ज २४ जुन २०२५ पासून ते १४ जुलै २०२५ पर्यंत मागवण्यात आले. प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी वयोमर्यादा हि २१ ते ३० वर्ष , तर शैक्षणिक पात्रता हि कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त सामान पत्रात अशी होती.या पोस्ट साठीची निवड प्रक्रिया हि तीन वेगवेगळ्या परीक्षांच्या यामध्ये सायकोमेट्रिक टेस्ट ,ग्रुप एक्सरसाइज ,आणि मुलाखत यांचा समावेश आहे.या पदासाठीचे परीक्षा शुल्क जनरल आणि ओबीसी साठी ७५० रुपये होते तर sc/st/pwd साठी निशुल्क होते.

SBI PO Exam Patterns
प्रोबेशनरी ऑफिसर य पदासाठीची प्रारंभिक परीक्षा हि २ ,४ आणि ५ ऑगस्ट मध्ये होणार आहे. तर या पदाची मुख्य परीक्षा सप्टेंबर २०२५ मध्ये होणार आहे. प्रारंभिक परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना या परीक्षेस सामोरे जावे लागणार आहे. हि परीक्षा संपूर्ण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी होणार असल्याने उमेवारांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे .या परीक्षेतील उमेदवारांनी आपल्या परिक्षग केंद्र वर निर्धारित कागदपत्रासह वेळेला अगोदर किमान एक तास पोहोचणे आवश्यक राहणार आहे. परीक्षेचे स्वरूप हे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असून त्याची वेळ हिएक तास असेल.यामध्ये किमान १०० प्रश्नांना उमेदवाराला सामोरे जावे लागणार आहे.

SBI PO Vacancies
एसबीआई च्या प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी सुमारे ५४१ पदे सून त्याचे जातीनिहाय वर्गीकर पुढील प्रमाणे
एससी- ७५ पदे ,एसटी – ३७ पदे ,ओबीसी – १३५ पदे ,इडब्लूएस – ५० पदे ,अनारक्षित – २०३ पदे ,मागील रिक्त पदे – ४१ अश्या याप्रकारे नवीन आणि मागील अशी दोन्ही मिळून ५४१ पदे या पोस्ट साठी भरण्यात येणार आहेत.
