Site icon AplaNewsKatta

Tanushree Dutta Instagram Viral Video – तनुश्री दत्ता चा इंस्टाग्राम वर रडतानाचा व्हिडिओ वायरल

TANUSHREE DUTTA

Tanushree Dutta Instagram Viral Video – तनुश्री दत्ता चा इंस्टाग्राम वर रडतानाचा व्हिडिओ वायरल

बॉलिवूड मधील नायिका तनुश्री दत्त हिने नुकताच एक व्हिडीओ जगासमोर आणला आहे . इंस्टाग्राम वरील या व्हिडीओ मध्ये ती रडताना दिसत आहे . या व्हिडीओ मध्ये त्यांनी आपल्या वर होणाऱ्या अन्यायाची वाचा फोडली आहे . त्यांचं त्यांच्याच घरात कशाप्रकारे शोषण केले जात आहे हे या व्हिडीओ च्या माध्यमातून सांगण्यात आले आहे .

Who Is Tanushree Datta – तनुश्री दत्ता कोण ?

‘आशिक बनाया आपने ‘ या चित्रपटा तुन तनुश्री दत्ता हि सर्वाच्या ओळखीची झाली. इमरान हाश्मी आणि तनुश्री यांची जोडी कमालीची प्रसिद्ध झाली होती . तनुश्री ने अनेक चित्रपटात काम केले आहे . तिने नाना पाटेकरांनी भूमिका असणाऱ्या ‘हॉर्न ओके प्लिज ‘ या चित्रपटात देखील काम केले होते. बॉलिवूड मधील मिटू या चळवळ ची सुरुवात सुद्धा तनुश्री यांनी केली होती. नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केल्यावर तनुश्री हि जास्त फोकस ला आल्याचं चित्र आहे.. आता तनुश्री वेगळ्याच कारणासाठी चर्चेचा विषय ठरली आहे . तनुश्री चे तिच्याच घरात शोषण केले जात असून ती साधी मोलकरीण सुद्धा ठेऊ शकत नाहीये असं तीच म्हणणं आहे .

Tanushree Dutta Harasment Started From 2018

तनुश्री दत्ता हि गेल्या चार ते पाच वर्षांपासून शोषण सहन करत आली आहे . याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तनुश्री यांनी यासंबंधी पोलिसांत मदत मागितली आहे आणि पोलिसांनी एक पथक पाठवून यासंबंधी विचारणा केली असल्याचं स्पष्ट झालं आहे . तनुश्री यांना सुद्धा पोलिसांनी चौकशी साठी बोलावलं आहे आणि त्यांनी आपण दोन दिवसांत यासाठी जाणार असल्याच स्पष्ट केलं आहे . तनुश्री यांच्या घरातील मोलकरीण आहे त्यांच्याशी त्यांचे संबंध चांगले नसल्याचं हि त्यांचं म्हणणं आहे . तसेच त्यांच्या घरातील मोलकरीण त्यांचं सामान चोरी करत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि घरातील आपलं काम हे माळ स्वतःलाच करावे लागत असल्याचं हि त्यांचं म्हणणं आहे.

Tanushree Dutta Instagram Video

तनुश्री दत्ता यांच्या व्हिडिओ मध्ये अजून बरेचसे खळबळ जनक खुलासे उघड झाले आहेत .त्यांच्या मते त्या आपल्याच घरात खूप जास्त त्रासलेल्या आहेत. खूप जास्त रडत असताना त्यांनी आपण मेंटली सुद्धा शोषण झाल्याचं नमूद केलं. हा व्हिडिओ इंस्टग्राम वर झळकल्यानंतर चाहत्यांनी त्यांना थोडी अशा दिली आहे आणि या साठी तिला पाठिंबा हि दिला आहे .

Tanushree Dutta Another Video

तनुश्री यांनी आणखी एक व्हिडिओ शेयर करत म्हटले आहे कि त्यांना त्यांचे कश्याप्रकारे शोषण केले जात आहे . या व्हिडिओ मध्ये आसपास खूप जोरात गोंगाट चालेल आपणास पाहायला मिळेल. हि गोष्ट २०२० पासून माझ्यासोबत रोज होत असल्याचेही त्यांचं म्हणणं आहे . मोठ्या प्रमाणात होणार गोंगाट ,कधीही केव्हाही जोरात आवाज , दरवाज्या बाहेर मोठा आवाज आणि अजूनही मोठे आवाज यांचा यात समावेश आहे . यासंदर्भात इमारत प्रशासनाकडे त्यांनी वारंवार तक्रार केली असून त्याचा काही फायदा झाला नाही . इमारत प्रशासनाने कोणतेही पाऊल न घेतल्याने कंटाळून त्यांनी तक्रार करणे सोडून दिले.

Tanushree Dutta CRYING

तनुश्री दत्ता या स्वतःच्या घरात होणाऱ्या शोषणामुळे अधिक खचल्या असून इंस्टाग्राम वरील व्हिडिओ मध्ये जास्त रडताना दिसत आहेत. या व्हिडिओ मध्ये त्याची मानसिक तब्येत बरोबर नसल्याचेही दिसून येत आहे .त्यांनी आता पोलीस प्रशासनाची मदत घेतली असून चाहत्यांनी सुध्दा धीर देण्याचं काम केलं आहे .

Exit mobile version