Site icon AplaNewsKatta

टाटा सफारी आणि टाटा हॅरिअर चे नवीन मॉडेल टाटा कडून लाँच – Tata Safari And Tata Harrier Adventure X Plus Redefines the Road

TATA SAFARI ADVENTURE

Where Power Meets Elegance: The 2025 TATA Safari Experience

टाटा समूह भारतीय वाहन बाजारातील एक अग्रगण्य कंपनी आहे. भारतातील रोड वर टाटा च्या अधिक गाड्या धावताना दिसतात. टाटा मोटर्स कडून नवीन डिझाईन मध्ये अनेक गाड्या लाँच केल्या जातात.ऑगस्ट महिन्यात टाटा कडून टाटा सफारी आणि टाटा हॅरिअर चे नवीन व्हेरिएंट लाँच केले आहे. भारतीय SUV क्षेत्रात टाटा सफारीचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. वर्ष २०२५ मध्ये टाटा मोटर्सने सफारीला नव्या रूपात सादर करून बाजारात खळबळ उडवली आहे. आधुनिकीकरणाच्या दिशेने टाटा मोटर्सचे हे पाऊल केवळ डिझाइनपर्यंत मर्यादित नाही, तर ते तंत्रज्ञान, सुरक्षा आणि वापरकर्त्याच्या अनुभवातही झपाट्याने सुधारणा करणारे आहे. याच सोबत टाटा हरिएर मध्ये सुद्धा अनेक नवीन गोष्टी आहेत.

PRICE OF TATA SAFARI AND TATA HARRIER – अंदाजे किंमत काय असावी

२०२५ मध्ये टाटा मोटर्सने आपली दोन प्रतिष्ठित SUV मॉडेल्स टाटा हॅरिअर अ‍ॅडव्हेंचर एक्स आणि टाटा सफारी अ‍ॅडव्हेंचर एक्स प्लस भारतामध्ये यशस्वीरित्या लाँच केल्या. या नव्या व्हेरियंट्समधून टाटा कंपनीने भारतीय SUV बाजारातील आपले स्थान अधिक मजबूत केले असून रस्त्यावरची उपस्थिती, शक्तिशाली परफॉर्मन्स आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांचा एक सुंदर मिलाफ प्रस्तुत केला आहे. हॅरिअर अ‍ॅडव्हेंचर एक्स ची प्रारंभिक किंमत ₹१८.९९ लाख आहे, तर सफारी अ‍ॅडव्हेंचर एक्स प्लस ₹१९.९९ लाख या किंमतीत उपलब्ध आहे.

थोडक्यात इंजिन विषयी – TATA SAFARI AND TATA HARRIER ENGINE AND OTHERS FEATURES

दोन्ही वाहनांमध्ये २.० लीटर KRYOTEC डिझेल इंजिन आहे, जे १७० bhp पॉवर आणि ३५० Nm टॉर्क निर्माण करते. याशिवाय, ६-स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, Level-2 ADAS, ३६०° कॅमेरा, वॉइस-असिस्टेड पॅनोरॅमिक सनरूफ, ESP, आणि रेन-सेंसिंग वायपर्स यांसारखी अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त वैशिष्ट्ये दोन्ही SUV मध्ये उपलब्ध आहेत. हॅरिअरमध्ये “Seaweed Green” बाह्य रंग आणि “Onyx Trail” इंटीरियर मिळतो, तर सफारीमध्ये “Supernova Copper” रंग आणि “Adventure Oak” लेदरट इंटीरियर सादर केला आहे. या नवीन व्हेरियंट्सने भारतातील SUV प्रवासासाठी एक नवा मानदंड तयार केला आहे, जो केवळ परफॉर्मन्सच नव्हे, तर लक्झरी आणि सुरक्षितता यांना सुद्धा समान महत्त्व देतो. टाटा मोटर्सच्या या नव्या लाँचमुळे साहसी आणि स्मार्ट ग्राहकांना आकर्षित करण्याचा एक उत्तम प्रयत्न दिसून येतो.

TATA SAFARI X VARIENTS AND PRICE

टाटा मोटर्स कडून नवीन टाटा सफारी चे सहा व्हेरिएंट लाँच केले आहेत. यामध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे सर्वच मॉडेल्स हे अधिक प्रभावी व आकर्षक डिझाईन मध्ये उपलब्ध केले आहे. तसेच या सर्व मॉडेल्स साठी वेगवेगळी किंमत मोजावी लागणार आह. टाटा सफारी च्या या मॉडेल्स ची किंमत हि ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वैध राहील.

TATA HARRIER X ADVENTURE PRICE

टाटा कडून टाटा हॅरिअर गाडी नव्या रूपात लाँच करण्यात आली आहे. नवीन टाटा हॅरिअर X व्हेरियंट्स हे सहा व्हेरियंट्समध्ये उपलब्ध केली असून यामध्ये जुन्या मॉडेल्स पेक्षा अधिक जास्त नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. या सहा नवीन व्हेरिएंट्स साठी किंमत देखील वेगळी असणार आहे.

TATA SAFARI ADVENTURE X ENGINE AND FEATURES

नवीन टाटा सफारी हि जुन्या मॉडेल्स पेक्षा अधिक दमदार असणार आहे. यामध्ये नवीन डिझेल इंजिन देण्यात आले असून ते ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल या दोन्ही प्रकारे काम करू शकणार आहे.

इंजिन: 2.0L KRYOTEC टर्बोचार्ज्ड डिझेल

पॉवर: 170 hp (167.62 bhp)

टॉर्क: 350 Nm

गिअरबॉक्स: 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही पर्याय

ड्राइव्ह टाइप: फ्रंट-व्हील ड्राइव्ह (FWD)

या मधील काही प्रमुख वैशिष्ट्य –

श्रेणीवैशिष्ट्ये
सुरक्षा6 एअरबॅग्स, Quad Disc ब्रेक्स, ESP, 5-स्टार GNCAP रेटिंग
ADASLevel 2 ADAS (Adaptive Cruise Control फक्त AT मध्ये), Driver Doze Alert
ड्रायव्हिंग मोड्सCity, Sport, Eco + Trail Modes (Normal, Wet, Rough)
इंटीरियरAdventure Oak थीम, Tan लेदर अपहोल्स्ट्री, ErgoLux ड्रायव्हर सीट (मेमरी फंक्शनसह)
टेक्नॉलॉजी10.25″ टचस्क्रीन, 360° कॅमेरा, डिजिटल क्लस्टर, Wireless Android Auto/Apple CarPlay
सुविधापॅनोरॅमिक सनरूफ (वॉइस कंट्रोल), इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक (Auto Hold), AquaSense वायपर्स, TrailSense हेडलॅम्प्स
डिझाइनR18 Apex Forged अलॉय व्हील्स, Supernova Copper बाह्य रंग
TATA HARRIER ENGINE AND FEATURES

टाटा हॅरिअर गाडी मध्ये जुन्या मॉडेल पेक्षा अधिक दमदार इंजिन देण्यात आले आहे. ६-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. या गाडीचे मायलेज अंदाजे १६ ते १७ किलोमीटर असू शकते.

इंजिन प्रकार: 2.0L KRYOTEC टर्बो डिझेल

पॉवर: 170 hp (167.62 bhp)

टॉर्क: 350 Nm

गिअरबॉक्स: 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही पर्याय

ड्राइव्ह टाइप: फ्रंट व्हील ड्राइव्ह (FWD

या मधील काही प्रमुख वैशिष्ट्य –

सुरक्षा6 एअरबॅग्स, ESP, ISOFIX, हिल स्टार्ट असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल, रेन-सेंसिंग वायपर्स
ADASLevel-2 ADAS (फक्त AT मध्ये), Adaptive Cruise Control, ड्रायव्हर डोझ अलर्ट4
ड्रायव्हिंग मोड्सEco, City, Sport + Trail Modes: Normal, Wet, Rough
इंटीरियरOnyx Trail थीम, ब्लॅक-टॅन लेदर अपहोल्स्ट्री, 6-वे विद्युत ड्रायव्हर सीट
तंत्रज्ञान10.25″ टचस्क्रीन, डिजिटल क्लस्टर, Wireless Android Auto/Apple CarPlay, 360° कॅमेरा
सुविधापॅनोरॅमिक सनरूफ (वॉइस कंट्रोल), इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक (Auto Hold), ऑटो हेडलॅम्प्स
डिझाइनSeaweed Green बाह्य रंग, 17-इंच अलॉय व्हील्स, फ्लोटिंग रूफ डिझाइन6

TATA SAFARI AND TATA HARRIER ADVENTURE X COMPARISON

Tata Safari Adventure X Plus आणि Tata Harrier Adventure X ही दोन्ही SUV मॉडेल्स एकाच डिझेल इंजिन आणि तंत्रज्ञानासह येतात, पण Safari मध्ये थोडं अधिक प्रीमियम आणि स्पेशियस सेटअप आहे. Harrier ही किंमतीच्या बाबतीत अधिक परवडणारी असून शहरातील ड्रायव्हिंगसाठी अधिक सोईची आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये ADAS, 360° कॅमेरा आणि पॅनोरामिक सनरूफ सारखी फीचर्स आहेत.

TATA SAFARI ADVENTURES X AND TATA HARRIER ADVENTURE X

टाटा कडून सफारी आणि हॅरिअर या दोन गाड्यांचे नवीन व्हेरिएंट बाजारात लाँच जरी केले असले तरी त्यांच्या यअगोदर च्या मॉडेल्स ची कमी होणार नाही हे नक्की. या दोनही गाड्या वापरकर्त्यांना किती प्रमाणात आपल्याकडे आकर्षित करतात हे हि पाहून महत्वाचं ठरेल. टाटा कडून या गाड्यांच्या किमतीत बराचसा आला आहे. आता या गाड्यांपैकी कोणती गाड्यांपैकी कोणती गाडी जास्त ग्राहकांच्या पसंतीस पाहण्यासारखे आहे.टाटा मोटर्स अश्याच प्रकारे अनेक नवीन मॉडेल्स बाजारात लाँच करतील जे ग्राहकांसाठी अधिक मजबूत आणि टिकावू असू शकेल .तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड यासोबत टाटा मोटर्स कडून नवीन गाड्यांमध्ये देण्यात येऊ शकेल.

अधिक वाचा –https://www.cardekho.com/india-car-news/2025-tata-safari-variantwise-features-explained-34822.htm

Exit mobile version