Vivo T4 Pro 5G : फ्लॅगशिप फिचर्स, मिड-रेंजमध्ये धमाका!
मिड-रेंज स्मार्टफोन मार्केटमध्ये Vivo पुन्हा एकदा चर्चेत आहे. Vivo T4 Pro 5G भारतात २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता लॉन्च होणार असून, त्याच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीबाबत आधीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या फोन ची किंमत ₹२५,००० ते ₹३०,००० दरम्यान असून हा फोन “फ्लॅगशिप फिचर्स मिड-रेंजमध्ये” या संकल्पनेला नवा अर्थ देऊ शकतो. पण हा खरोखर गेम-चेंजर आहे का? की फक्त Vivo S30 5G चं भारतीय रूपांतर? चला, तर मग या फोन विषयी अधिक जाणून घेऊया.
Vivo T4 Pro डिझाइन : चार बाजूंनी वाकलेली स्क्रीन, थेट फ्लॅगशिप लूक
Vivo T4 Pro मध्ये क्वाड-कर्व्ह AMOLED डिस्प्ले असून तो सामान्यतः फक्त फ्लॅगशिप श्रेणीतील फोनमध्येच पाहायला मिळतो. याचा 1.5K रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, आणि HDR10+ सपोर्ट यामुळे स्क्रीनवर दिसणारी प्रत्येक गोष्ट अधिक स्पष्ट, रंगीत आणि जीवंत वाटते. व्हिडिओ स्ट्रीमिंग, गेमिंग, किंवा सोशल मीडिया स्क्रोल करताना याचा व्हिज्युअल अनुभव प्रीमियम लेव्हलचा वाटतो. स्क्रीनच्या चारही बाजूंनी असलेली वक्रता (quad-curve) केवळ सौंदर्यवृद्धी करत नाही, तर हातात धरताना फोनला एक नैसर्गिक ग्रिप आणि एर्गोनॉमिक फील देते.
Blaze Gold आणि Nitro Blue हे कलर ऑप्शन्स केवळ रंग नाहीत तर ते व्यक्तिमत्व दर्शवतात. Blaze Gold हा स्टायलिश आणि लक्षवेधी आहे, तर Nitro Blue अधिक प्रोफेशनल आणि सटल लूक देतो. याशिवाय, फोनच्या मागील बाजूला असलेला पिल-शेप कॅमेरा मॉड्यूल हा डिझाइनचा एक फ्यूचरिस्टिक टच आहे. जो बाजारात उपलब्ध असलेल्या इतर फोनपेक्षा वेगळा आणि उठून दिसतो.

परफॉर्मन्स : Snapdragon 7 Gen 4 चा पॉवर गेम
vivo T या फोनमध्ये Snapdragon 7 Gen 4 चिपसेटदेण्यात आला असून तो नवीनतम AI इंजिनसह येतो आणि परफॉर्मन्समध्ये लक्षणीय सुधारणा करतो. हे चिपसेट केवळ वेगवान प्रोसेसिंगच नाही, तर स्मार्ट बॅटरी मॅनेजमेंट, गेमिंगसाठी GPU ऑप्टिमायझेशन, आणि फोटो एडिटिंगसाठी ऑन-डिव्हाइस AI सपोर्टही देते. त्यामुळे वापरकर्त्याला प्रत्येक टास्कमध्ये स्मार्ट आणि स्मूद अनुभव मिळतो.
12GB RAM आणि 256GB UFS 2.2 स्टोरेज यामुळे मोठ्या अॅप्स, मल्टीटास्किंग, आणि हाय-एंड गेम्स सहज चालतात. फोन हँग होण्याचा प्रश्नच येत नाही एकाच वेळी अनेक अॅप्स वापरत असताना देखील परफॉर्मन्स स्थिर राहतो. UFS 2.2 स्टोरेजमुळे डेटा रीड/राइट स्पीड अधिक चांगला मिळतो, ज्यामुळे अॅप्स लवकर ओपन होतात आणि फाइल्स जलद ट्रान्सफर होतात.
हा फोन Android 15 आणि Vivo चं FunTouch OS 15 सोबत मिळत असून जे एक क्लीन, मिनिमल आणि कस्टमायझेबल UI देतं. यामध्ये डार्क मोड, थीम्स, अॅप ड्रॉअर, आणि स्मार्ट जेस्चर कंट्रोल्ससारखे अनेक युजर-फ्रेंडली फिचर्स आहेत. UI इतकं सहज आणि आकर्षक आहे की नव्या वापरकर्त्यालाही लगेच सवय होते. तसेच, Vivo ने OS मध्ये अनावश्यक अॅप्स कमी ठेवले आहेत, जे फोनला clutter-free आणि फास्ट बनवतात.
कॅमेरा : झूम करा, फ्लॅगशिपला मागे टाका
Vivo T4 Pro 5G चा कॅमेरा विभाग म्हणजे मिड-रेंज सेगमेंटमध्ये फ्लॅगशिपचा अनुभव देण्याचा प्रयत्न आहे. या फोनमध्ये 50MP Sony IMX882 पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स आहे, जी 3x ऑप्टिकल झूम आणि AI-बेस्ड स्टॅबिलायझेशनसह येते. हे फिचर सामान्यतः ₹५०,०००च्या वरच्या फोनमध्येच पाहायला मिळते, पण Vivo ने ते मिड-रेंजमध्ये आणून स्पर्धकांना थेट आव्हान दिलं आहे.

याशिवाय, 50MP प्रायमरी सेन्सर (OIS आणि Aura Light सह) आणि 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स यामुळे तुम्ही कोणताही फ्रेम गमावणार नाही. लो-लाइट पोर्ट्रेट्स, स्ट्रीट फोटोग्राफी, किंवा झूम शॉट्स अश्या सगळ्याच परिस्थितीत T4 Pro चा कॅमेरा स्थिर, स्पष्ट आणि रंगीत फोटो देतो. सेल्फी प्रेमींना Vivo ने खास भेट दिली असून 50MP फ्रंट कॅमेरा ऑटोफोकससह, जो व्हिडिओ कॉल्स, रील्स आणि पोर्ट्रेट्ससाठी परफेक्ट आहे. फेस डिटेक्शन, ब्यूटी मोड, आणि HDR सपोर्ट यामुळे प्रत्येक सेल्फी प्रोफेशनल वाटते.
VIVO T4 PRO 5G – BATTERY PERFORMANCE
Vivo T4 Pro 5Gमध्ये 5500mAh ची मोठी बॅटरी देण्यात अली असून ती एकदा चार्ज केल्यावर सहजपणे दिवसभराचा वापर देऊ शकते. गेमिंग, व्हिडिओ कॉल्स, आणि सोशल स्क्रोलिंगसह हि बॅटरी दिवसभर कार्य करण्यास बनवली आहे. Vivo ने या फोन ला चार्जिंग करण्यासाठी 80W फ्लॅश चार्जिंग सपोर्ट दिला असून फक्त ३० मिनिटांत ० ते ७०% पर्यंत फोन चार्ज होणार आहे. हा चार्जर फोन सोबत बॉक्समध्येच मिळणार आहे. जे आजकाल फ्लॅगशिप फोन मध्ये क्वचितच पाहायला मिळतं.
कनेक्टिव्हिटी आणि एक्स्ट्रा फिचर्स
Vivo T4 Pro 5G कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत अगदी अप-टू-डेट आहे. यामध्ये ड्युअल 5G सपोर्ट, Wi-Fi 6, Bluetooth 5.3, आणि NFC यास , फोनमध्ये IR ब्लास्टर दिला आहे, ज्यामुळे तो युनिव्हर्सल रिमोटसारखा वापरता येतो. X-axis linear motor आणि स्टेरिओ स्पीकर्स यामुळे गेमिंग आणि मीडिया अनुभव अधिक immersive होतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट, हाय-रेझ ऑडिओ सपोर्ट, आणि IP54 स्प्लॅश रेसिस्टन्ससारखी छोटी पण उपयुक्त फिचर्स Vivo ने नीटपणे पॅक केली आहेत. एकंदरीत, T4 Pro 5G हे केवळ कॅमेरा आणि बॅटरीसाठी नाही, तर युजर एक्सपीरियन्सला पूर्णपणे अपग्रेड करण्यासाठी तयार आहे.
Vivo T4 Pro 5G – Full Specifications & Price
Category | Specification |
---|---|
Launch Date | August 2025 (India) |
Price (Expected) | ₹22,999 (8GB+128GB) <br> ₹24,999 (8GB+256GB) |
Display | 6.78″ FHD+ AMOLED, 120Hz refresh rate, 1300 nits peak brightness |
Processor | MediaTek Dimensity 7200 (4nm) |
RAM & Storage | 8GB/12GB LPDDR4X RAM <br> 128GB/256GB UFS 2.2 storage |
Rear Camera | 50MP Sony IMX882 (OIS) + 50MP Periscope Telephoto (3x Zoom) + 8MP Ultra-wide |
Front Camera | 50MP Auto Focus |
Battery | 5500mAh |
Charging | 80W FlashCharge (charger included) |
OS | Funtouch OS 14 (Android 14) |
Connectivity | Dual 5G, Wi-Fi 6, Bluetooth 5.3, NFC, IR Blaster |
Audio | Stereo speakers, Hi-Res Audio, 3.5mm jack: ❌ |
Security | In-display fingerprint sensor |
Build & Extras | IP54 rating, X-axis linear motor, slim design (~8.1mm) |
Colors | Starry Purple, Midnight Black |