Vivo V60 5G भारतात लॉन्च
Vivo ने आज, 12 ऑगस्ट 2025 रोजी भारतात आपला बहुप्रतिक्षित Vivo V60 5G स्मार्टफोन अधिकृतपणे लॉन्च केला आहे. उत्कृष्ट कॅमेरा, दमदार परफॉर्मन्स आणि स्टायलिश डिझाइनसह Vivo V60 5G हा स्मार्टफोन मध्यम किंमत श्रेणीतील स्मार्टफोन असून तो बाजारात क्रांती घडवण्यास सज्ज आहे. तुम्ही फोटोप्रेमी असाल, गेमिंगचा शौकीन असाल किंवा एक उत्तम स्मार्टफोन शोधत असाल तर Vivo V60 5G तुमच्या सर्व गरजा पूर्ण करणारा स्मार्टफोन ठरेल.
Vivo V60 5G लॉन्च इव्हेंट : कुठे पाहायचे?
विवो कडून हा लॉन्च इव्हेंट दुपारी १२ वाजता Vivo India च्या अधिकृत YouTube चॅनेलवर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट प्रसारित करण्यात आला. लॉन्चनंतर हा स्मार्टफोन Flipkart, Amazon आणि Vivo च्या अधिकृत वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Vivo V60 5G भारतातील किंमत
विवो कडून या स्मार्टफोन ची अधिकृत किंमत लॉन्चवेळी जाहीर केली जाईल, पण सुरुवातीच्या अहवालानुसार Vivo V60 5G ची प्रारंभिक किंमत ₹36,999 असण्याची शक्यता आहे जी 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठीअसण्याची शक्यता आहे. ही किंमत भारतातील इतर मिड-रेंज फ्लॅगशिप स्मार्टफोनशी स्पर्धा करण्यास सक्षम आहे.
VIVO V60 5G रंग पर्याय
Vivo V60 5G तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल :
- शुभ गोल्ड
- मिस्ट ग्रे
- मूनलिट ब्लू
हे रंग साधेपणा आणि स्टाईल यांचा उत्तम समतोल साधतात.
Vivo V60 5G कॅमेरा वैशिष्ट्ये
Vivo V60 5G मध्ये Zeiss ब्रँडचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, जो AI तंत्रज्ञानासह उत्तम फोटोग्राफी अनुभव देतो :
- 50MP Sony IMX766 मुख्य कॅमेरा (OIS सह)
- 50MP Sony IMX882 टेलिफोटो लेन्स
- अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा
- सेल्फीसाठी 50MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो कंटेंट क्रिएटर्ससाठी आदर्श आहे.
Vivo V60 5G डिस्प्ले आणि डिझाइन
Vivo V60 5G मध्ये 6.67-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे .
- 120Hz रिफ्रेश रेट
- 1.5K रिझोल्यूशन
- कर्व्हड एजेस आणि मिनिमल बेजल्स
- होल-पंच फ्रंट कॅमेरा
हा डिस्प्ले गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्यासाठी अत्यंत आकर्षक ठरणारआहे.
Vivo V60 5G परफॉर्मन्स आणि सॉफ्टवेअर
विवो कडून या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर देण्यात आला आहे. Vivo कडून यामध्ये CPU आणि GPU परफॉर्मन्समध्ये Vivo V50 पेक्षा लक्षणीय सुधारणा करण्यात आली आहे. तसेच या फोनमध्ये Funtouch OS 15 जो Android 15 आधारित असणारा आहे. जो वापरण्यास अधिक सोपा आणि कस्टमायझेशनसाठी उपयुक्त ठरणार आहे.
Vivo V60 5G बॅटरी आणि चार्जिंग
Vivo V60 5G मध्ये 6,500mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी दिवसभर वापरासाठी पुरेशी आहे. तर फास्ट चार्जिंग सपोर्टची अपेक्षा आहे. लाँच वेळी या फोन मधील अनेक रहस्य उलगडले जातील. बॅटरी चार्जिंग साठी चांगला चार्जर सुद्धा देण्यात येईल हे नक्की.
Vivo V60 5G उपलब्धता आणि खरेदी पर्याय
लाँचनंतर Vivo V60 5G खालील प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल:
- Flipkart
- Amazon India
- Vivo ची अधिकृत वेबसाइट
या फोन वर लाँच ऑफर्स आणि डिस्काउंट्स मिळण्याची शक्यता आहे आणि हा फोन थोडा स्वस्त हि मिळू शकतो..