Hero Glamour X 125 लॉन्च – स्टायलिश लूक, डिजिटल डॅश आणि Hero ची परंपरा पण खरंच काही वेगळं आहे का?

Hero Glamour X 125 लॉन्च – स्टायलिश लूक, डिजिटल डॅश आणि Hero ची परंपरा पण खरंच काही वेगळं आहे का?

भारतीय कम्युटर बाईक मार्केटमध्ये Hero MotoCorp ने नवीन Glamour X 125 हि गाडी लॉन्च केली आहे. हि गाडी ₹89,999 ते ₹99,999 (एक्स-शोरूम) दरात उपलब्ध असलेली ही बाईक 125cc सेगमेंटमध्ये Honda SP 125, TVS Raider आणि Bajaj Pulsar 125 यांच्याशी थेट स्पर्धा करणार आहे. या सेगमेंटमध्ये आधीच प्रस्थापित ब्रँड्स आणि मॉडेल्सची गर्दी आहे, ज्यांनी ग्राहकांच्या मनात विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. मग ते Honda चं refinement असो, TVS चा स्पोर्टी लूक असो किंवा Pulsar ची जुनी प्रतिष्ठा जपणे असो.

hero glamour x

Hero Glamour X च्या बाबतीत, कंपनीने नव्या युगातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत. जसे की LED हेडलॅम्प, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, आणि Xtreme मालिकेप्रमाणे स्टायलिश बॉडी ग्राफिक्स. पण या गर्दीत Glamour X काही वेगळं सिद्ध करू शकते का? की ही फक्त जुन्या डिझाईनची नव्या रंगातली आवृत्ती आहे, जी केवळ ब्रँड लॉयल्टीवरच टिकून राहणार आहे?

आजचा ग्राहक फक्त मायलेज आणि किंमत पाहत नाही, तर तो बाईकच्या लूक, टेक्नॉलॉजी, आणि राइडिंग एक्सपीरियन्सकडेही तितक्याच बारकाईने पाहतो. त्यामुळे Hero ला जर खरंच या सेगमेंटमध्ये आपलं स्थान मजबूत करायचं असेल, तर त्यांना फक्त अपडेटेड डिझाईनपेक्षा जास्त काही देणं गरजेचं आहे.

Hero Glamour X 125 -तांत्रिक तपशील

Hero Glamour X 125 ही बाईक 124.7cc एअर-कूल्ड, फ्युएल-इंजेक्टेड इंजिनसह येते, जी 10.7 bhp पॉवर आणि 10.6 Nm टॉर्क निर्माण करते. 5-स्पीड गिअरबॉक्स, LED हेडलॅम्प, आणि फुली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह ही बाईक आधुनिकतेचा स्पर्श देते. ड्रम आणि डिस्क अशा दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असलेली Glamour X अंदाजे 60–63 km/l मायलेज देते, आणि तिची किंमत ₹89,999 ते ₹99,999 दरम्यान आहे. शहरातील रोजच्या वापरासाठी ही एक स्टायलिश आणि टेक-फ्रेंडली पर्याय ठरू शकते.

घटकमाहिती
इंजिन124.7cc, एअर-कूल्ड, सिंगल सिलिंडर, फ्युएल-इंजेक्टेड
पॉवर10.7 bhp @ 7,500 rpm
टॉर्क10.6 Nm @ 6,000 rpm
गिअरबॉक्स5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन
ब्रेक्सड्रम आणि डिस्क व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध
सस्पेन्शनपुढे टेलिस्कोपिक फोर्क, मागे ड्युअल शॉक अ‍ॅब्जॉर्बर्स
डिजिटल डॅशफुली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, real-time mileage, trip meter
हेडलॅम्पएलईडी युनिट
इंधन टाकी क्षमतासुमारे 10 लिटर
मायलेज (दावा)अंदाजे 60–63 km/l
किंमत₹89,999 ते ₹99,999 (एक्स-शोरूम)
रंग पर्यायस्पोर्टी ड्युअल-टोन रंगसंगती (Hero Xtreme स्टाइल प्रेरित)

स्पर्धकांची तुलना: कोण आहे खरी ‘125cc स्टार’?

hero glamour 125 x

भारतीय 125cc कम्युटर बाईक सेगमेंटमध्ये Hero Glamour X चा प्रवेश झाला असला, तरी या वर्गात आधीच काही मजबूत आणि लोकप्रिय पर्याय उपलब्ध आहेत. किंमत, मायलेज, डिझाईन आणि ब्रँड व्हॅल्यूच्या आधारे खालील स्पर्धकांची तुलना पाहा:

बाईककिंमत (₹)मायलेज (km/l)खासियत
Honda SP 125₹93,247 – ₹1.03L~65गुळगुळीत इंजिन, Honda ची विश्वासार्हता
TVS Raider 125₹87,375 – ₹1.03L~60–65स्पोर्टी लूक, स्मार्ट फीचर्स, युथ अपील
Bajaj Pulsar 125₹85,178 – ₹94,451~51–58aggressive डिझाईन, जुनी प्रतिष्ठा
Hero Glamour X₹89,999 – ₹99,999~60–63स्टायलिश अपडेट्स, डिजिटल डॅश, Hero ब्रँड

Hero Glamour X ही किंमतीत स्पर्धात्मक आहे, मायलेजही समाधानकारक आहे, आणि डिजिटल डॅशसारखे आधुनिक फीचर्सही देत आहे. मात्र, TVS Raider चा स्पोर्टी लूक आणि Honda SP125 ची refinement यांच्याशी स्पर्धा करताना Glamour X ला स्वतःचं वेगळं identity निर्माण करणं गरजेचं आहे.

Hero Glamour X 125 Price

Hero MotoCorp ने 20 ऑगस्ट 2025 रोजी नवी Glamour X 125 बाईक अधिकृतपणे भारतीय बाजारात लॉन्च केली. ही बाईक 125cc कम्युटर सेगमेंटमध्ये आधुनिक फीचर्ससह सादर करण्यात आली असून, शहरातील रोजच्या वापरासाठी उपयुक्त ठरते.

किंमत (एक्स-शोरूम, दिल्ली):

  • ड्रम ब्रेक व्हेरिएंट: ₹89,999
  • डिस्क ब्रेक व्हेरिएंट: ₹99,999

या किंमतीत Hero ने स्पर्धात्मक भूमिका घेतली आहे, जिथे मायलेज, डिजिटल डॅश आणि स्टायलिश लूक यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतो. Honda SP125 आणि TVS Raider सारख्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा किंमत थोडीशी कमी ठेवून, Hero ने “टेक + व्हॅल्यू” कॉम्बो देण्याचा प्रयत्न केला आहे.

glamour x 125
नव्या युगात जुनी पावले?

Hero Glamour X 125 ही बाईक नव्या पिढीच्या अपेक्षांना लक्षात घेऊन सादर करण्यात आली असली, तरी तिच्या मूळ रचनेत फारसा क्रांतिकारी बदल दिसत नाही. डिजिटल डॅश, LED हेडलॅम्प आणि स्टायलिश बॉडी ग्राफिक्स हे फीचर्स आजच्या बाजारात “बेसिक अपग्रेड” मानले जातात. Rider 125 सारख्या बाईक्सने जेव्हा स्मार्ट कनेक्टिविटी, स्पोर्टी स्टान्स आणि युथ अपीलवर भर दिला आहे, तेव्हा Glamour X ची ओळख अजूनही पारंपरिक आणि सुरक्षित वाटते. Hero ने ब्रँड लॉयल्टीवर विश्वास ठेवत एक “अपडेटेड” आवृत्ती सादर केली आहे, पण ती “नव्या युगातील गरजांशी सुसंगत” आहे का, हा खरा प्रश्न आहे. ग्राहक आता फक्त मायलेज नाही, तर अनुभव, स्टाइल आणि टेक्नॉलॉजी शोधतात आणि त्यासाठी फक्त जुन्या पावलांना नव्या रंगात रंगवून चालणार नाही.

Leave a Comment