KINGDOM : Vijay Deverakonda’s Spy Saga Ignites Screens – स्पाय मोड ऑन : विजय देवरकोंडाचा ‘किंगडम’ स्फोटक
किंगडम चित्रपटात विजय देवरकोंडा ने मुख्य भूमिका साकारली आहे. किंगडम हा चित्रपट ३१ जुलै २०२५ ला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात विजय चा नवीन अवतार पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील भूमिका सर्वच प्रेक्षकांचे मनावर राज्य करेल. किंगडम हा चित्रपट स्पाय आणि ऍक्शन या कथेवर ऍथॉरिटी आहे तर विजय चा नवीन अंदाज या कथेला एक वेगळी उंची देताना दिसत आहे.
KIGDOM MOVIE CAST
किंगडम या चित्रपटात विजय देवरकोंडा ची मुख्य भूमिका असून विजय सोबत मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री बोरसे हि या चित्रपटात चांगली भीमीक साकारताना दिसेल. या चित्रपटात मुख्य खलनायक म्हणून वेंकटेश .वी.पी यांनी भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील सर्व भूमिका खालील प्रमाणे
भूमिका | कलाकार |
---|---|
👮♂️ सुर्या “सुरी” (मुख्य पोलिस पात्र) | विजय देवरकोंडा |
👦 लहान सुर्या | रोहित कामरा |
👨👦 शिवा (सुरीचा मोठा भाऊ) | सत्यदेव कंचराना |
👦 लहान शिवा | कोथाला भानु प्रकाश |
👩⚕️ डॉ. अनु (सुरीची प्रेमिका) | भाग्यश्री बोरसे |
😈 मुरुगन (विलन, स्मगलिंग किंग) | वेंकिटेश वी. पी. |
🧘♂️ स्वामीजी | अय्यप्पा पी. शर्मा |
👮 कमिशनर | पोसानी कृष्णा मुरली |
👮 राजन्ना (सुरीचा सहकारी) | गोपराजू रमणा |
🕵️♂️ विश्वा सिंग (सुरीचा स्पाय हँडलर) | मनीष चौधरी |
🧠 दिलीप नायर | बाबुराज |
💻 इतर सहाय्यक कलाकार | सुधर्शन, महेश अचंता, राजकुमार कासिरेड्डी, अजित कोशी, श्रवण इत्यादी |

KINGDOM MOVIE BUDGET
किंगडम हा चित्रपट अंदाजे १३० कोटी रुपये कारच करून बनवण्यात आला आहे. या चित्रपटाचे निर्माते हे सिथारा एंटरटेनमेंट्स, श्रीकारा स्टुडिओज, फॉर्च्यून फोर सिनेमा आहेत. तर या चित्रपटाचे ओटीटी हक्क हे नेटफ्लिक्स ला विकले गेले आहेत. या चित्रपटासाठी विजय ने कोणतीही फी आकारली नसून त्याने जर चित्रपट चालला तरं त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून आपली फी घेणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्या दिवशी ७ कोटी पेक्षा जास्त कामे केली आहे. तसेच या चित्रपटाचे थिएटर राईट्स हे सुमारे ५४ कोटीला विकले गेले आहेत.
KINGDOM MOVIE STORY
किंगडम चित्रपटाची कथा हि ब्रिटिशकालीन संघर्ष योद्ध्या च्या रूपाने होते. तर सूरी म्हणजेच विजय हा एक सामान्य पोलीस असतो. त्याला एक गुप्त कार्य सोपवलं जात व त्यातून त्याला जेल मध्ये जावं लागत तिथं त्याला त्याचा हरवलेला भाऊ मिळतो. शिवा म्हणजेच त्याचा भाऊ हा या गुन्हेगारी सिंडिकेट चा प्रमुख असतो व यातून या दोघांमध्ये भावनिक संघर्ष सुरु होतो. या चित्रपटाची कथा हि अनेक वेगवेगळ्या रूपात दाखवण्यात आल्याने हा चित्रपट अर्थपूर्ण बनतो.

KINGDOM MOVIE DIRECTOR AND MUSIC
किंगडम या चित्रपटाचे दिग्दर्शन हे गौतम तिन्नानुरी यांनी केले आहे. गौतम तिन्नानुरी यांनी जर्सी आणि माली रावा हे चित्रपट सुद्धा दिग्दर्शित केले असून यांमुळे ते जास्त प्रसिद्ध झाले. किंगडम या चित्रपटाचे संगीत हे अनिरुद्ध रविचंदर यांनी साकारले आहे. या चित्रपटात प्रमुख तीन गाणी आहेत जी प्रेक्षकांची मने चित्रपटासोबत बांधून ठेवतात.यामध्ये ह्रिदयम लोपाला , अण्णा अन्तेने , रागिले रागिले या गाण्यांमधून प्रेम आणि आत्मसंवाद ,बंधुत्व आणि संघर्ष ,विद्रोह आणि भावनिक उधळण अश्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.
KINGDOM MOVIE RELEASE LANGUAGES
किंगडम चित्रपटाची मुख्य भाषा हि तेलगू आहे. विजय च्या मूळ आवाजात या भाषेत संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. तसेच हा चित्रपट दक्षिण भारतातील प्रेक्षकांसाठी तमिळ भाषेत डब करण्यात आला आहे. उत्तर भारत आणि राष्ट्रीय स्तरा साठी हा चित्रपट हिंदी भाषेत डब करण्यात आला आहे.

KINGDOM MOVIE FIRST DAY COLLECTION
विजय च्या किंगडम चित्रपटाने जागतिक स्तरावर १२.५ कोटी रुपयांची दमदार कामे केली आहे. १३० कोटी बजेट असणाऱ्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली ओपनिंग केल्याचं दिसत आहे. विजय च्या द फॅमिली स्टार या चित्रपटाच्या कमाईला मागे टाकले आहे. भारतात ७.०७ कोटी पहिल्या दिवशी कमाई केली तर जागतिक स्तरावर १२.५ कोटी अशे मिळून सुमारे १२.५ कोटींचा गल्ला जमवला आहे.