UPI – १ ऑगस्टपासून UPI मध्ये मोठे बदल – जाणून घ्या नवीन नियम

भारतिचे बँकिंग क्षेत्रात नवीन क्रांती हि भारतीय डिजिटल पेमेंट्स च्या रूपाने आली. सर्वाच्या हातात असलेल्या फोने मधून आर्थिक व्यवहार व्हायला लागले.या क्रांतीने आर्थिक व्यवहार अगदी सुरळीत झाले. भारतात हे आर्थिक वव्यवहार सुरळीत आणि सुलभ होण्यासाठी NPCI (NATIONAL PAYMENTS CORPORATION OF INDIA ) ची स्थापना हि २००९ मध्ये करण्यात आली. भारतीय रिझर्व बँकेकडून यासाठीची घोषणा करण्यात आली होती. UPI द्वारे अकागदविरहित आणि सुरक्षित रित्या पैश्याचे व्यवहार केला जातील अशी आशा भारतीय रिझर्व बँकेला होती.
UPI HISTORY – युपीआय चा इतिहास
भारतिचे बँकिंग क्षेत्रात नवीन क्रांती हि भारतीय डिजिटल पेमेंट्स च्या रूपाने आली. सर्वाच्या हातात असलेल्या फोने मधून आर्थिक व्यवहार व्हायला लागले.या क्रांतीने आर्थिक व्यवहार अगदी सुरळीत झाले. भारतात हे आर्थिक वव्यवहार सुरळीत आणि सुलभ होण्यासाठी NPCI (NATIONAL PAYMENTS CORPORATION OF INDIA ) ची स्थापना हि २००९ मध्ये करण्यात आली. भारतीय रिझर्व बँकेकडून यासाठीची घोषणा करण्यात आली होती. UPI द्वारे अकागदविरहित आणि सुरक्षित रित्या पैश्याचे व्यवहार केला जातील अशी आशा भारतीय रिझर्व बँकेला होती.

UPI OLD RULES – युपीआय ची जुनी नियमावली
UPI संबंधी नवीन नियमावली १ ऑगस्ट २०२५ पासून लागू झाली आहे. याअगोदर युपीआय मध्ये जास्त नियम नसल्याचं लक्षात येते. युपीआय द्वारे बँकेतील बॅलन्स तपासणी कोणतीही मर्यादा नव्हती. ग्राहक आपले बँक खात्यातील शिल्लक रक्कम कितीही वेळा तपासू शकत होता.तसेच आपल्या बँक खात्याचा तपशील सुद्धा कितीही वेळा पाहू शकत होत. यासाठी सुद्धा कोणतीही मर्यादा आखण्यात आली नाही. काही आर्थिक व्यवहार हे ऑटोपे च्या माध्यमातून कधीही आणि केव्हा हि पार पडले जात. यासाठी वेळेची मर्यादा नव्हती. तसेच व्याव्व्हर करणाऱ्या व्यक्तीला समोरील प्राप्तकर्त्याचे नाव स्पष्ट दिसत नव्हते. या मधून पैसे इतरत्र जाण्याचा धोका वाढत होता.
फीचर | पूर्वीचा नियम |
---|---|
🏦 बॅलन्स तपासणी | कोणतीही मर्यादा नव्हती – वापरकर्ते कितीही वेळा बॅलन्स तपासू शकत होते |
📲 बँक खाते पाहणे | लिंक केलेले खाते कितीही वेळा पाहता येत होते – कोणतीही मर्यादा नव्हती |
🔁 ऑटोपे व्यवहार | कोणत्याही वेळी ऑटोपे व्यवहार होऊ शकत होते – पीक वेळेची मर्यादा नव्हती |
⏳ पेंडिंग स्टेटस तपासणी | व्यवहाराचा स्टेटस कितीही वेळा तपासता येत होता – वेळेचे अंतर नव्हते |
👤 प्राप्तकर्ता नाव | प्राप्तकर्त्याचे नाव काही अॅप्समध्ये स्पष्ट दिसत नव्हते – धोका वाढत होता |
🔐 API वापर | API कॉल्सवर फारसा नियंत्रण नव्हता – त्यामुळे सर्व्हरवर ताण वाढत होता |
UPI OLD RULES CHALLENGE’S
UPI च्या जुन्या नियमांमुळे बँकिंग सर्वर वर ताण येऊन यंत्रणा काही काळासाठी निकामी व्हायची. या साठी वारंवार बॅलन्स तपासणे व व्यवहार तपासणे हि करणे कारणीभूत ठरायची. युपीआय सर्वर वर जास्त ताण आल्यामुळे व्यवहार होन्यास वेळ लागत असे. तसेच या नियमनमुळे चुकीच्या ग्राहकाला पैसे पाठवण्याचे धोके जास्त प्रमाणात होते.जास्त प्रमाणात UPI अँप्स चा वापर यांमुळे सिस्टिम वर लोड येऊन व्यवहार ठप्प होत होते.
UPI NEW RULES – युपीआय नविन नियमावली
नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन ऑफ इंडिया UPI वरील वाढत लोड आणि वारंवार होणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी नवीन नियम हे १ ऑगस्ट २०२५ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमांमुळे UPI पेमेंट्स सुरणात होण्यास अधिक मदत मिळेल.
१. बॅलन्स चेक – १ ऑगस्ट २०२५ पासून बॅलन्स चेक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आता ग्राहक दिवसामध्ये फक्त ५० वेळा आपला बँक बॅलन्स चेक करता येईल.
२. AUTOPAY साठी वेळ निश्चित – ऑटोपे व्यवहारासाठी वेळ निश्चित करण्यात अली असून ते सकाळी १० वाजण्यापूर्वी ,दुपारी १ ते ५ आणि रात्री ९:३० च्या नंतर व्यवहार केले जातील.
३. बँक खाते तपासणी – बँकेचे खाते तपासण्यासाठी आता दिवसात फक्त २५ वेळा मुभा. एका अँप च्या माध्यमातून आपण २५ वेळच खाते तपासू शकतो.
४. व्यवहार चे स्टेटस तपासणी – व्यवहार पूर्ण झाला का नाही याचे स्टेटस आता दिवसातून फक्त तीन वेळा पाहता येणार. हे स्टेटस पाहण्यासाठी प्रत्येक वेळी ९० सेकंद अंतराचा विधी आवश्यक असणार आहे.
५. चार्जबॅक मर्यादा – एका महिन्यात फक्त १० वेळा चार्ज बॅक ची विनंती स्वीकारली जाईल. तसेच एकाच व्यक्ती कडून हि विनंती ५ वेळा करता येईल.
फीचर | नवीन नियम |
---|---|
🏦 बॅलन्स तपासणी मर्यादा | दिवसातून फक्त ५० वेळा बॅलन्स तपासता येईल |
📲 बँक खाते पाहण्याची मर्यादा | एका अॅपवरून दिवसातून फक्त २५ वेळा खाते तपशील पाहता येईल |
⏳ पेमेंट स्टेटस तपासणी | दिवसातून फक्त ३ वेळा, आणि प्रत्येक वेळेस ९० सेकंदांचे अंतर आवश्यक |
🔁 ऑटोपे व्यवहार वेळ मर्यादा | फक्त सकाळी १० पूर्वी, दुपारी १ ते ५, किंवा रात्री ९:३० नंतरच प्रक्रिया होईल |
🔄 चार्जबॅक मर्यादा | एका महिन्यात फक्त १० वेळा, आणि एका व्यक्तीकडून फक्त ५ वेळा पेमेंट रिव्हर्सल करता येईल |
युपीआय मधील नवीन नियम लागू झाल्याने युपीआय वरील ताण कमी होण्यास नक्की मदत होईल. तसेच सुरक्षित आर्थिक व्यवहारांसाठी नवीन नियम हे अधिक फायद्याचे ठरतील.