Vietnamese VinFast EV Makers Open Big Showroom In Chennai – व्हिएतनाम स्तिथ विनफास्ट इलेक्ट्रिक ची भारतात शानदार एन्ट्री
व्हिएतनाम स्तिथ विनफास्ट इलेक्ट्रिक ची भारतात शानदार एन्ट्री केली आहे. सुरत मध्ये पहिले शोरूम उघडल्यानंतर आता कंपनी ने चेन्नई मध्ये आपलं दुसरं मोठं शोरूम उघडले आहे. व्हिएतनाम मधील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणारी कंपनी विनफास्ट कडून अधिकृत रित्या भारतीय बाजारात दाखल झाली. गुजरात मधील सुरत शहरात कंपनीने आपले पहिले शोरूम सुरु केले. सुरत मध्ये सुमारे ३००० चौरस फूट एवढ्या आकारात हे शोरूम असून यामध्ये बऱ्याचश्या सुविधा कंपनी तर्फे देण्यात येतात.आता कंपनी कडून अधिकृतपणे चेन्नई येथे ४७०० चौरस फूट असे मोठे नवीन शोरूम उघडले असून यामध्ये सुद्धा ग्राहकांसाठी अनेक सेवा आणि सुविधा देण्यात येतील.
VinFAST Electric Vehicle’s Going To Display – चेन्नई शोरूम प्रदर्शनातील वाहने
चेन्नई मधील teynampet या भागात व्हिएतनाम मधील इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी विनफास्ट कडून मोठ्या आकाराचे शोरूम सुरु केले आहे. हे शोरूम मानसरोवर मोटर्स याच्या मदतीने उभारले असून ते ४,७०० चौरस फुटाचे आहे. हे शोरूम विनफास्ट कंपनी साठी नव्या संधी शोधण्यात अधिक मदत करेल. तसेच अधिक ग्राहकांपर्यंत आपली वाहने पोहचवण्यात त्यांचे सहकार्य करेल. विनफास्ट चे या निमित्ताने भारतातील EV उद्योगात महत्वाचा टप्पा असेन. चेन्नई येथील शोरूम मध्ये VinFast VF 6 हि कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV आणि VinFast VF 7 हि मोठी आणि प्रीमियम SUV अश्या दोन गाड्या उपलब्ध असणार आहेत. या दोनही गाड्या सुरत येथील शोरूम मध्ये देखील प्रदर्शनासाठी तसेच विक्री साठी उपलब्ध होत्या.
Model | Segment | Highlights |
---|---|---|
VF 6 | Compact SUV | Sleek design, smart tech, urban-ready |
VF 7 | Premium SUV | Spacious, high-range, advanced connectivity |
https://www.pinterest.com/ideas/vinfast/945182090131
VinFast – Inside The Chainnai Showroom – चैन्नई च्या शोरूम मध्ये काय पाहायला मिळेल
विनफास्ट कडून मानसरोवर मोटर्स याच्या साथीदाराने चेन्नई येथे मोठे शोरूम सुरु केले आहे. या शोरूम मध्ये विनफास्ट कडून आपल्या दोन suv वाहने प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. तसेच या शोरूम मध्ये या वाहनांचे डिजिटल इंटरॅक्शन झोन बनवण्यात आला आहे. या झोन मध्येग्राहकांना गाडीबद्दल आणि त्यांच्या फीचर्स बद्दल माहिती मिळेल. तसेच कन्सल्टेशन लाउंज मध्ये ग्राहकांना या कंपनी विषयी वैयक्तिक मार्गदर्शन , गाडी खरेदी विषयी मार्गदर्शन आणि फायनान्स चा सल्ला देखील मिळू शकणार आहे. ग्राहकांसाठी या शोरूम मध्ये टेस्ट ड्राईव्ह घेण्याची सुद्धा सोय करण्यात आली आहे.विनफास्ट कडून या शोरूम चे डिझाइन हे अधिक सुदर व आकर्षक करण्यात आले असून यात कंपनीचा ठसा चांगल्या प्रकारे दिसून येतो.
VinFast Electric Vehicle Booking – विनफास्ट वाहन बुकिंग
व्हिएतनाम मधील प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन निर्माता VinFast ने भारतात आपली VF 6 आणि VF 7 SUV मॉडेल्ससाठी प्री-बुकिंग सुरू केली आहे. केवळ ₹21,000 मध्ये ही बुकिंग करता येते आणि ती पूर्णपणे परत मिळू शकते. VF 6 ही कॉम्पॅक्ट SUV असून तिची रेंज सुमारे 440 किमी आहे, तर VF 7 ही प्रीमियम SUV सुमारे 450+ किमी रेंजसह येते. दोन्ही गाड्यांमध्ये आधुनिक ADAS टेक्नॉलॉजी, कनेक्टेड फीचर्स आणि आकर्षक डिझाइन आहे. VinFast चे शोरूम चेन्नई आणि सुरत येथे सुरू झाले असून, ऑगस्ट 2025 मध्ये या वाहनांची डिलिव्हरी अपेक्षित आहे. भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात VinFast एक नवा आणि दमदार पर्याय ठरणार आहे. बुकिंग साठी Official Website – https://vinfastauto.in
VinFast India Factory And Collabrations
विनफास्ट कडून भारतात आपली फॅक्टरी सुद्धा उभारण्यात आली आहे. विनफास्ट कडून तामिळनाडू येथील थूथुकुडी येथे सुमारे १६,७०० कोटींची गुंतवणूक करून सुसज्ज अशी फॅक्टरी उभारली आहे. या फॅक्टरी मधून दरवर्षी १.५ लाख इलेक्ट्रिक वाहने तयार केली जातील. हि वाहने श्रीलंका ,नेपाळ ,आणि काही आफ्रिकन देशांसाठी निर्यात केली जातील. भारतातील इव्ही मार्केट मध्ये विनफास्ट च हे खूपच महत्वाचं पाऊल असणार आहे.या फॅक्टरी स्थापने सोबत विनफास्ट हि कंपनी भारतातील इतर कंपन्यांसोबत मोठी भागीदारी करेल.
VinFast VF 6 And VF 7 Electric Vehicles
व्हिएतनाम मधील आघाडीच्या इलेक्ट्रिक कंपनी विनफास्ट कडून भारतीय ग्राहकांसाठी दोन मॉडेल्स सध्या बाजारात प्रदर्शित केले आहेत. यामध्ये VF ६ आणि VF ७ या दोन SUV भारतात लवकरच ग्राहकांना चालवण्यास मिळणार आहेत. विनफास्ट कडून यासाठी तामिळनाडू येथील थूथुकुडी येथे मोठी फॅक्टरी स्थापित केली आहे. यांमधील VF ६ मध्ये ५९.६ किलोवॅट ची बॅटरी मिळत असून याची रेंज सुमारे ४४० किमी एवढी आहे. तसेच हि गाडी २०१ BHP , ३०१ Nm एवढी पॉवर तयार करू शकते. तसेच या गाडीमध्ये १२.९ इंच मोठा टचस्क्रीन डिस्प्ले , ADAS लेव्हल २ ,पॅनोरामिक रूफ ,कनेक्टेड कार टेक अशे फीचर्स मिळतात. तर VF ७ मध्ये ७५.३ किलोवॅट ची बॅटरी मिळते आणि या गाडीची रेंज ४५० पेक्षा अधिक आहे. तसेच या गाडीची पॉवर ३४९ BHP ,५०० Nm आहे. विनफास्ट च्या या गाडीमध्ये वायरलेस चार्जिंग ,ADAS लेव्हल २ , सिग्नेचर LED लायटिंग आणि ३६० कॅमेरा अशे फीचर्स मिळतात.
VinFast Vehicles Future Expansions
विनफास्ट कंपनी कडून भारतात मोठी गुंतवणूक करण्यात अली असून याचा फायदा अनेक गोष्टींमध्ये होणार आहे. विनफास्ट कंपनी कडून उभारण्यात आलेल्या फॅक्टरी मध्ये सध्या ५०,००० वाहने वर्षाला बनवण्यात येणार असून भविष्यात वाहन उत्पादनाची क्षमता हि १.५ लाख पर्यंत वाढणारा आहे. या कंपनी च्या मार्फत स्थानिक रोजगार निर्मिती होणार असून यामध्ये ३००० पेक्षा अधिक नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. विनफास्ट ची हि कंपनी भविष्यात भारतातून इतर देशात आपली वाहने निर्यात देखील करणार आहे. तसेच हि कंपनी भारताच्या इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला चालना देणार असून अधिक सुविधा प्रदान करणार आहे. विनफास्ट कडून RoadGrid – चार्जिंग नेटवर्क स्थापित केले जाणार आहे जे इलेकट्रीक वाहनासाठी सर्वात महत्वाचे असणार आहे. त्याचप्रमाणे स्पेअर पार्ट्स ,रोडसाइड असिस्टंट ,बॅटरी रिसायकलिंग आणि पुनर्वापर अश्या सुविधा भविष्यात कंपनीतर्फे देण्यात येणार आहेत.
Indian Ev Market And VinFast – भारतातील EV बाजार आणि VinFast ची संधी
भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा वाहन बाजार असून, इलेक्ट्रिक वाहनांसाठी एक प्रचंड संधी निर्माण करत आहे. वाढती इंधन किंमत, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची गरज आणि सरकारच्या FAME व PLI योजनांमुळे EV क्षेत्रात मोठा बदल घडतो आहे. याच पार्श्वभूमीवर व्हिएतनामची कंपनी VinFast ने भारतात आपली उपस्थिती दाखवली आहे. सूरतमध्ये पहिली शोरूम सुरू करून VF6 आणि VF7 या SUV मॉडेल्ससह त्यांनी भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची सुरुवात केली आहे. या वाहनांची किंमत ₹18 लाख ते ₹35 लाख दरम्यान असून, प्री-बुकिंग ₹21,000 मध्ये सुरू होते . विशेष म्हणजे VinFast तमिळनाडूच्या थूथुकुडी येथे ₹500 मिलियन गुंतवणुकीसह एक मोठी EV फॅक्टरी उभारत आहे, ज्यामुळे भारतात स्थानिक उत्पादन सुरू होईल आणि खर्चात बचत होईल. ही फॅक्टरी दरवर्षी 1.5 लाख वाहनं तयार करू शकते.VINFAST कडून हि वाहने श्रीलंका, नेपाळ, आफ्रिका व मध्य आशियात EV निर्यात करण्याची योजना आहे. VinFast ने चार्जिंग नेटवर्क, सेवा भागीदाऱ्या आणि बॅटरी रिसायकलिंगसाठीही अनेक कंपन्यांशी करार केले आहेत, ज्यामुळे एक संपूर्ण EV इकोसिस्टम तयार होणार आहे. Tesla सारख्या ब्रँड्स भारतात प्रवेश करत असताना VinFast ची किंमत तुलनेत अधिक स्पर्धात्मक आहे आणि स्थानिक उत्पादनामुळे ग्राहकांना अधिक किफायतशीर पर्याय मिळू शकतो. सरकारचे लक्ष्य आहे की 2030 पर्यंत एकूण कार विक्रीपैकी 30% EV असाव्यात, आणि अशा वेळी VinFast सारख्या ब्रँड्ससाठी भारतात दीर्घकालीन यशाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे